FILM Marathi

‘तीन अडकून सीताराम’चा टिझर प्रदर्शित (Teaser Released Of New Marathi Film ‘Teen Adkun Sitaram’)

इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचे उत्तर आपल्याला २९ सप्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.

टिझरमध्ये वैभव तत्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे राजकीय कुटुंबातील असून आलोक त्यांचा मित्र आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना दिसत आहेत. ‘दुनिया गेली तेल लावत’ असा काहीसा ॲटिट्यूड असणाऱ्या त्यांच्या आयुष्यात काहीतरी वादळ आल्याचे दिसत असून हे वादळ कसे निवळणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. टिझर पाहता कलाकारांची ही दमदार फळी आपल्या भन्नाट अभिनयाने चित्रपटात अधिकच रंगत आणणार आहेत. टिझरमध्ये वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे दिसत असले तरी चित्रपटात आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, ‘’ नावावरून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, नेमका हा चित्रपट आहे तरी काय? तर टिझरवरून प्रेक्षकांना अंदाज आला असेलच. यात काही रहस्य आहेत, गुंतागुंत आहे आणि हा गुंता अखेर सुटणार का? हे यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. ‘तीन अडकून सीताराम’चा खरा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.’’

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- सफलता की गूंज‌…  (Short Story- Saflta Ki Goonj…)

आज भी उसके कानों में अपनी देवरानी के शब्द गूंज रहे थे, "पता नहीं कैसी…

April 18, 2024

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची ९८ कोटींची संपत्ती इडीकडून जप्त, काय आहे संपूर्ण प्रकरण (Ed Attaches Shilpa Shetty Husband Raj Kundra Properties Worth Rs 98 Crores)

शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती आणि अभिनेता राज कुंद्रा पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. बिटकॉइन…

April 18, 2024

टेलिव्हिजनवर गाजलेल्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया या जोडीचं आता मराठी सिनेविश्वात पदार्पण (Arun Govil And Deepika Chikhalia Will Play Key Roles In Vir Murarbaji Movie)

३०-३५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली रामायण मालिका आजही तितकीच हिट आहे. या मालिकेत राम-सीतेची भूमिका साकारलेल्या…

April 18, 2024

चंपी… गुणाची की… (Champi… Gunachi Ki…)

चंपी… हेड मसाज ही लाख दुखो की एक दवा हैं…असं म्हणतात. ते खोटं नाही पण…

April 18, 2024

चंपी… गुणाची की…(Champi… Gunachi Ki…)

चंपी… हेड मसाज ही लाख दुखो की एक दवा हैं…असं म्हणतात. ते खोटं नाही पण…

April 18, 2024
© Merisaheli