Marathi

महिला दिनानिमित्त तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ची घोषणा (Tejaswini Pandit Announce Her Upcomming Movie ‘Yek Number’ on Women’s Day)

महिला दिनानिमित्ताने वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट प्रस्तुत एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या शुभदिनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘येक नंबर’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

‘व्हेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीचे चित्र नव्याने उलगडणार, हे नक्की!

‘येक नंबर’ अशी प्रेमकथा आहे, जी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल. संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या कथानकात अधिकच भर टाकणार आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी ‘येक नंबर’चे ५२ दिवस चित्रीकरण होणार आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

बढ़ते बिजली के बिल को कंट्रोल करने के स्मार्ट टिप्स (Smart Tips To Minimize Your Electricity Bill)

कई बार जानकारी न होने के कारण हम अनजाने में ही अपने घर के बिजली…

May 15, 2024

आयडेंटिटी (Short Story: Identity)

संगीता माथुरमाझं एक नाव आहे… माझी स्वतःची अशी आयडेंटिटी आहे. मी काम्या आहे. माझी स्वतंत्र…

May 15, 2024

बजरंगी भाईजान फेम मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा झाली १० वी पास, किती गुण मिळाले माहितीये ? ( Bajrangi Bhaijan Fame Munni Aka Harshali Malhotra Score 83 percent In 10 th Board)

बजरंगी भाईजान या सिनेमातून लोकप्रिय झालेली मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा सध्या सिनेमापासून दूर असली तरी…

May 15, 2024

कहानी- पाथेय (Short Story- Paathey)

मैं अक्सर आत्मविस्मृत होकर मुग्ध भाव से तुम्हें देखती रहती, पर मनु इसी भोली प्रक्रिया…

May 15, 2024
© Merisaheli