Marathi

या बॉलिवूड कलाकारांनी लावलेली आपल्याच आईवडीलांच्या दुसऱ्या लग्नात हजेरी, काही होते खुश तर काही ना खुश (These Bollywood Actors Attended The Second Marriage Of Their Parents)

या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावली होती.

सारा अली खान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सारा अली खानने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावली आहे. सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग 1991 मध्ये विवाहबद्ध झाले. सैफ अली खान त्याची पहिली पत्नी अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. लग्नानंतर अमृता आणि सैफ सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन मुलांचे पालक झाले. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने दुसरे लग्न केले नाही, मात्र करीना कपूरने सैफच्या आयुष्यात प्रवेश केला आणि दोघांनी २०१२ साली लग्न केले. सैफच्या दुसऱ्या लग्नाला त्याची दोन्ही मुलं हजर होती. एका मुलाखतीत सारा अली खानने सांगितले होते की, तिच्या आईने स्वतः तयार करून तिला सैफ-करीनाच्या लग्नासाठी पाठवले होते. तेव्हा सारा १७ वर्षांची होती.

शाहिद कपूर


अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावली होती, तर शाहिद कपूरने त्याची आई नीलिमा अझीमच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावली होती. नीलिमा अझीमने १९७९ मध्ये पंकज कपूरसोबत पहिले लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर तिने शाहिद कपूरला जन्म दिला, मात्र त्याच्या जन्माच्या काही वर्षांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. 1984 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. यानंतर तिने 1990 मध्ये राजेश खट्टरसोबत दुसरे लग्न केले, ज्यामध्ये शाहिद कपूर सहभागी झाला होता, परंतु अभिनेत्रीचे दुसरे लग्न केवळ 11 वर्षे टिकले.

या लग्नातून तिने इशान खट्टरला जन्म दिला आणि त्यानंतर 2001 मध्ये तिचे दुसरे लग्नही मोडले. यानंतर, 2004 मध्ये, अभिनेत्रीने प्रसिद्ध गायक रझा अली खान यांच्याशी तिसरे लग्न केले, परंतु दुर्दैवाने त्यांचे तिसरे लग्न देखील टिकले नाही आणि 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

अर्जुन कपूर
बोनी कपूर यांनी 1996 मध्ये दिवंगत हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीशी दुसरे लग्न केले, या लग्नात त्यांचा मुलगा अर्जुन कपूर देखील उपस्थित होता. बोनी कपूर यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नापासून जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. श्रीदेवीसोबत दुसरे लग्न करण्यापूर्वी बोनी कपूर यांनी 1983 मध्ये पहिले लग्न मोना शौरीशी केले आणि ते 1996 पर्यंत त्यांच्यासोबत राहिले. त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर अशी दोन मुले आहेत. असे म्हटले जाते की अर्जुन कपूर जरी त्याच्या वडिलांच्या दुस-या लग्नाला उपस्थित राहिला होता, तरीही तो त्या लग्नासाठी खुश नव्हता.

अर्जुनने एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो वैयक्तिक दु:ख, आघात आणि अनेक अशांततेतून गेला आहे. जेव्हा तो मोठा होत होता तेव्हा त्याला त्याच्या पालकांच्या वियोगातून जावे लागले. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता, कारण त्याचे वडील एक हाय प्रोफाईल व्यक्ती होते आणि ज्या महिलेला त्याने आपली दुसरी पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला होता ती देशातील एक मोठी सुपरस्टार होती.

अरहान खान

सलमान खानचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने पहिले लग्न मलायका अरोरासोबत केले होते. अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खानला हा इतर स्चार किड प्रमाणे प्रसिद्ध आहे. पहिली पत्नी मलायका अरोरापासून अनेक वर्षे वेगळं राहिल्यानंतर, अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरे लग्न केले. अरबाज आणि शूराचे लग्न त्यांची बहीण अर्पिता खानच्या बंगल्यात पार पडले, ज्यामध्ये कुटुंबाव्यतिरिक्त काही खास लोक उपस्थित होते. अरहान खानने वडील अरबाज खान यांच्या दुसऱ्या लग्नाला आनंदाने हजेरी लावली. एवढेच नाही तर त्या दोघांसाठी एक गाणेही गायले. अरहानची सावत्र आई शूरा खानसोबतही खूप चांगले बाँडिंग आहे, तर मलायका अरोरा घटस्फोटानंतर अर्जुन कपूरला डेट करत होती, परंतु दोघांचे ब्रेकअप झाले आहे.

जुनैद खान


बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दोनदा लग्न केले आहे, मात्र दुर्दैवाने त्याचा दुसऱ्या पत्नीपासूनही घटस्फोट झाला आहे. आमिर खानने 18 एप्रिल 1986 रोजी रीना दत्तासोबत गुपचूप पहिला विवाह केला होता. त्यावेळी आमिर 21 वर्षांचा होता, तर रीना 19 वर्षांची होती. या जोडप्याने तीन साक्षीदारांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले होते. दोघांनी लग्नासाठी 10 रुपये खर्च केले होते. लग्नानंतर दोघेही जुनैद आणि इरा खानचे आई-वडील झाले, पण 16 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. पहिली पत्नी रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने किरण रावशी दुसरे लग्न केले, ज्यामध्ये त्याचा मुलगा जुनैद देखील सहभागी झाला होता. आमिर खान आणि किरण राव यांची भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती, ज्यामध्ये किरण सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्याच्या दुसऱ्या लग्नापासून आमिर खानला आझाद राव खान हा मुलगा झाला, परंतु 15 वर्षांनंतर अभिनेत्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीपासूनही घटस्फोट घेतला.

सलमान खान
बॉलिवूडमधील भाईजान सलमान खान अजूनही अविवाहित आहे, परंतु त्याचे वडील सलीम खान यांनी दोनदा लग्न केले आहे. वास्तविक, सलीम खान यांनी १९६४ मध्ये सुशीला चरक यांच्याशी पहिले लग्न केले होते. सलमान, अरबाज आणि सोहेल खान हे सुशीलाची मुलं आहेत. विवाहित असूनही, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री हेलनवर सलीम खानचा जीव जडला, त्यानंतर त्यांनी 1981 मध्ये हेलनशी दुसरे लग्न केले.

असे म्हटले जाते की, सलमान खान त्याच्या वडिलांच्या दुस-या लग्नामुळे खूप नाराज होता, पण कालांतराने त्याने वडिलांचे दुसरे लग्न आणि हेलनला त्याची दुसरी आई म्हणून स्वीकारले. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी सलमान खान खूप मोठा होता.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

बोल्ड एंड ब्यूटीफुल मौनी रॉय, देखें तस्वीरें और वीडियो… (Bold And Beautiful Mouni Roy, See Beautiful Photos And Video)

अपने ख़ूबसूरत अंदाज़ और आकर्षक स्टाइल के लिए मशहूर हैं मौनी रॉय. वेस्टर्न आउटफिट हो…

March 11, 2025

Experience the Magic: Pratik Gaba Entertainment Presents Renowned Street Artist & DJ Alec Monopoly Mumbai & Delhi Tour

Pratik Gaba bought the renowned street artist and dj Alec monopoly to India. For an…

March 11, 2025

दीपिका कक्कर तिचं पहिलं लग्न आणि घटस्फोट याबद्दल झाली व्यक्त (Dipika Kakar Reacts On Daughter From First Marriage)

‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिकाने ७ वर्षांपूर्वी अभिनेता…

March 11, 2025

रिश्तों में परफेक्शन नहीं, ढूंढ़ें कनेक्शन (Relationship Isn’t About Chasing Perfection, It’s About Finding Connetion)

हम सभी अपने रिश्ते को परफेक्ट बनाना चाहते हैं, जिसके लिए हम अपने लिए ढूंढ़ना…

March 11, 2025

लघुकथा- दहलीज़ का बंधन… (Short Story- Dahleez Ka Bandhan…)

"जो लौट रहा है वो इस घर का बेटा है, भाई है. मेरा रिश्ता तो…

March 11, 2025
© Merisaheli