बॉलिवूडमधील रोमँटिक आणि पॉवर कपलपैकी एक रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचे लाखो चाहते आहेत. दोघांची केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही जितकी रोमँटिक आहे तितकीच रील लाईफमध्येही आहे. या दोघांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यातील ‘रामलीला’ हा चित्रपट दोघांसाठी खूप खास ठरला आहे, कारण या चित्रपटाच्या सेटवरच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. अर्थात या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणची जोडी खूप पसंत केली गेली. पण या चित्रपटासाठी दीपिका निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.
रणवीर सिंहने अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण 8’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. तो पत्नी दीपिका पदुकोणसोबत शोमध्ये पोहोचला होता, तिथे त्याने अनेक मनोरंजक खुलासे केले. यासोबतच अभिनेत्याने सांगितले की दीपिका पादुकोण ‘रामलीला’ चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती नव्हती.
रणवीरने सांगितले की, संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्याला आणि करीना कपूरला फायनल करण्यात आले होते. चित्रपटाचा सेट तयार होता, मात्र शूटिंगच्या आठवडाभर आधी काही कारणास्तव करीना कपूरला चित्रपट सोडावा लागला. अशा स्थितीत आता कोणाला कास्ट करायचं या विचारात सगळे बसले होते, तेवढ्यात दीपिकाचा ‘कॉकटेल’ चित्रपट प्रदर्शित झाला.
रणवीरने सांगितले की, जेव्हा मी भन्साळी आणि सर्व सहाय्यक दिग्दर्शक ऑफिसमध्ये बसून चित्रपटात कोणाला कास्ट करावे याबद्दल बोलत होतो, तेव्हा मी दीपिकाचे नाव घेतले कारण मी तिचा ‘कॉकटेल’ चित्रपट पाहिला होता. जेव्हा मी भन्साळींना दीपिकाच्या नावाचा उल्लेख केला तेव्हा त्यांनी तिला या चित्रपटासाठी ऑफर दिली आणि अशा प्रकारे ती या चित्रपटाचा भाग बनली.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि एकमेकांना डेट करू लागले. यानंतर ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटातही ही जोडी दिसली. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केले.
करीना कपूरबद्दल बोलायचे झाले तर, बेबोने भन्साळींसोबत काम करण्याची संधी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याआधी करीनाने भन्साळींच्या ‘देवदास’ चित्रपटालाही नाही म्हटले होते, ज्यात पारोच्या भूमिकेसाठी तिला अप्रोच करण्यात आले होते.
करिनाने ‘देवदास’साठी नकार दिल्यानंतर ती व्यक्तिरेखा ऐश्वर्या रायने साकारली होती. मात्र, याबाबत करीनाने सांगितले की, चित्रपटासाठी साइनिंग अमाउंट दिल्यानंतरही भन्साळींनी अचानक तिची या चित्रपटातून जागा घेतली, ज्यामुळे ती खूप दुखावली गेली होती. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
रणबीर कपूरसाठी आजचा दिवस खास आहे. आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी तो त्याचा 42 वा…
स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल…
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने धर्माची भिंत तोडून झहीर इक्बालसोबत लग्न केले. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे…
पती अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसते. पुन्हा…
सौतेली मां का रिश्ता सदियों से बदनाम रहा है, मैं सोचती थी कि तुम पर…
टीवी की मोस्ट पॉपुलर नागिन मौनी रॉय (Mouni Roy) का आज यानी 28 सितंबर को…