Marathi

 आम्ही फक्त मुलं जन्मला घालतो, स्टारकिड त्यांना प्रेक्षक बनवतात… स्पष्टच बोलला सैफ अली खान (‘We Don’t Make The Star Kid, Star Kids Are Made By Audiences… Says Saif Ali Khan)

सैफ अली खान आणि करिनाने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्याने अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडले. दरम्यान, स्टार किड्सबद्दलही चर्चा झाली, कारण बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. असे मानले जाते की स्टार किड्सना संघर्ष करावा लागत नाही किंवा कास्टिंग काउचला सामोरे जावे लागत नाही.

सैफ आणि करीनाबद्दल बोलायचे झाले तर ते दोघेही स्टार किड्स आहेत आणि आता त्यांची दोन्ही मुले तैमूर आणि जेहसुद्धा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. याच विषयावर, जेव्हा सैफ आणि करिनाला विचारले गेले की स्टार किड्सना चित्रपट इतक्या सहजपणे कसे मिळतात, तेव्हा सैफ म्हणाला – ‘प्रेक्षक आणि लोक स्टार किड्समध्ये खूप रस घेतात. आर्चीजच्या कलाकारांचेच उदाहरण घ्या – लोक त्याबद्दल खूप बोलत होते, त्यांचे फोटो सतत काढले जात होते, त्यामुळे उद्या त्यांच्यापैकी कोणाला घेऊन चित्रपट बनवायचा असेल तर ते रॉकेट सायन्स नाही. कुणाला तरी बनवायला नक्कीच आवडेल. ते तुमचं हे लक्ष का आणि कुठून येतं हे तुम्हीच ठरवावं.

हे स्पष्ट करताना सैफने त्याचा मुलगा तैमूरचे उदाहरण दिले – ‘तैमूर तायक्वांदो करत होता, लोक त्याचे फोटो काढत होते, इंटरनेटवर त्याचे रील्स आहेत. आम्हाला असे लक्ष नको आहे. आम्ही स्टारकिड्स बनवत नाही. आम्ही मुलांना जन्म देतो, पण पत्रकार, छायाचित्रकार आणि मग जनता त्यांना स्टारकीड बनवतात. जनतेला कदाचित निष्पापपणे फक्त स्टार किड पहायचे आहे.

करिनानेही या मुद्द्यावर सांगितले की, लोकांमध्ये एक नैसर्गिक उत्साह आहे. हा त्यांचा मुलगा आहे की मुलगी आहे, हे लोकांच्या मनात कायम आहे.

याशिवाय, चित्रपट कुटुंबाशी संबंधित आडनाव ठेवण्याचे काय फायदे आहेत यावर बेबो म्हणाली – तुमचे आडनाव असू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्यात प्रतिभा आहे किंवा तुम्ही यशस्वी व्हाल. हे प्रेक्षक ठरवतात. याशिवाय अभिनेत्रीने असेही सांगितले की, सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स असण्याने तुम्ही स्टार बनत नाही, तुम्ही स्टार आहात हे तुम्हाला तुमच्या कामातून सिद्ध करावे लागेल.

करीना आणि सैफ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचा इशाराही या मुलाखतीत देण्यात आला होता.

Akanksha Talekar

Recent Posts

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025
© Merisaheli