TV Marathi

 या अभिनेत्रीमुळे शहनाझने केलेला आत्महत्येचा प्रयत्न (When Shehnaaz Gill Tried to Commit Suicide, She took This Step after Being upset)

टीव्हीवरील सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 13’ मध्ये आपल्या धडाकेबाज अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या शहनाज गिलला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाज गिलने आपल्या मेहनतीच्या जोरावर टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे शहनाज गिलसाठी इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, तिच्या आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा एका अभिनेत्रीवर नाराज होऊन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.

‘बिग बॉस 13’ मध्ये, शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत तिच्या रोमान्स आणि जबरदस्त केमिस्ट्रीने चाहत्यांचे मनोरंजन केले. या शोमुळे शहनाजला प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला.

शहनाजने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली, त्यानंतर ती अनेक पंजाबी गाण्यांमध्ये दिसली. तिच्या मेहनती जोरावर शहनाज हळूहळू पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली, पण त्याच वेळी एक वेळ अशी आली जेव्हा शहनाजने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानामुळे तिने असे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

या दोन अभिनेत्रींमधील वैर तेव्हापासून सुरू झाले जेव्हा शहनाजने लाइव्ह जाऊन हिमांशीविरुद्ध अपशब्द वापरले आणि तिच्या एका गाण्याला सर्वात वाईट म्हटले. शहनाजच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या हिमांशीने सोशल मीडियावर लाईव्ह सेशन घेऊन बदला घेतला आणि शहनाजला खडसावले. या घटनेनंतर दोघेही एकमेकांना खूप वाईट बोलल्या.

दोघांमधील भांडणाची मालिका इथेच संपली नाही, शहनाज आणि हिमांशी यांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली. यामुळे दुखावलेल्या शहनाजने आत्महत्येचा प्रयत्न केला. याचा खुलासा खुद्द शहनाजचे वडील संतोष गिल यांनी केला असून हिमांशी खुरानामुळे त्यांच्या मुलीने असे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

हिमांशी खुरानाला याची माहिती मिळताच तिने सोशल मीडियावर ट्विट केले आणि म्हणाली – जर तुमच्या मुलीने माझ्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला असेल तर माफ करा, पण कृपया तुमच्या मुलीला समजावून सांगा, कारण तिने स्वतःच हा वाद निर्माण केला आणि नंतर ती स्वतः अस्वस्थ झाली. तुमच्या मुलीने स्वतः कॅनडातील एका मुलाखतीत सांगितले आहे की, वादामुळे तिला काम मिळत आहे.

जेव्हा शहनाज गिल स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात पोहोचली होती, तेव्हा तिची अवस्था वाईट होती आणि हिमांशी खुरानाची एंट्री पाहून ती रडू लागली होती. मात्र, घरच्यांनी समजावल्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलू लागल्या. मात्र, बिग बॉसच्या घरात हिमांशी आणि शहनाजचे बोलणे सुरू झाले असले तरी आजही दोघी एकमेकांना टाळताना दिसल्या.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- मां की सीख (Short Story- Maa Ki Seekh)

राजेश मां की बातें सुन कर आश्चर्य एवं आक्रोश से कहने लगा, "मां, कई वर्षो…

November 19, 2024

लेक आणि जावयाच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने परिणीताची आई रीना चोप्रा यांनी भेट केलं स्वतः रेखाटलेलं सुंदर चित्र (Parineeti Chopra And Raghav Get Special Anniversary Gift From Her Mom Reena, And It’s ‘Hand-Painted’)

अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं.…

November 19, 2024

असित मोदीसोबतच्या भांडणांच्या चर्चांवर जेठालालने सोडलं मौन(Jethalal Dilip Joshi Holds Producer Asit Modi’s Collar In Massive Fight, Threatened Producer To Leave The Show, Now Jethalal Reveals The Truth)

टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा बऱ्याच काळापासून सर्वांचा आवडता शो…

November 19, 2024

जागतिक टेलिव्हिजन डेच्या निम्मिताने, मेघा धाडेने पत्रातून मानले टीव्हीचे आभार (Megha Dhade Write Letter for World Televsion Day)

जागतिक टेलिव्हिजन डेच्या निम्मिताने 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत भैरवीची भूमिका गाजवत असेलेली अभिनेत्री मेघा धाडेने…

November 19, 2024
© Merisaheli