सोनी लिव्हने नुकतेच सिरीज ‘राज जवां है’चा ट्रेलर लाँच केला आणि प्रेक्षकांकडून सुरूवातीला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त आहे. तसेच सिरीजमधील कलाकारांचे (प्रिया बापट, बरूण सोबती आणि अंजली आनंद) त्यांच्या परफॉर्मन्ससाठी कौतुक करण्यात आले आहे. या सिरीजमध्ये सुमनची भूमिका साकारणारी प्रिया बापट हा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तिला सतत मिळत असलेले कौतुक पाहून भारावून गेली आहे.
सिरीजच्या या ट्रेलरमधून तिची परिवर्तनात्मक भूमिका दिसून आली आहे, तसेच प्रेक्षकांना या सिरीजच्या उत्तम कथानकाची लक्षवेधक झलक देखील पाहायला मिळते. सिरीजचे कथानक तीन जिवलग मित्र – राधिका (अंजली आनंद), अविनाश (बरूण सोबती) आणि सुमन (प्रिया बापट) यांच्या अनपेक्षित जीवनाला सादर करते, जेथे ते सर्वात रोमांचक प्रवासाची सुरूवात करतात, ते म्हणजे तान्ह्या मुलांचे संगोपन.
सुमनची भूमिका साकारण्याच्या अनुभवाबाबत सांगताना अभिनेत्री प्रिया बापट म्हणाल्या, “कथानकाने प्रबळ पाया रचला असला तरी सुमीत व्यास (दिग्दर्शक) आणि ख्याती आनंद-पुथरन (लेखक व निर्माते) यांचे माहितीपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले, ज्यामुळे माझी भूमिका सुमनला आकार मिळाला. त्यांचे दिग्दर्शन व लेखनामुळे मला सुमनच्या भूमिकेमधील भावनिकतेबाबतच्या बारकाव्यांचा शोध घेण्यास व आत्मसात करण्यास मदत झाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी या भूमिकेच्या आत्मनिरीक्षणशील व संघर्षाची सवय नसलेल्या स्वभावाला वास्तविकपणे सादर करू शकले.”
यामिनी पिक्चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित सिरीज ‘राज जवां है’चे लेखन व निर्मिती ख्याती आनंद – पुथरन यांनी केले आहे आणि अत्यंत प्रतिभावान सुमीत व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्ये प्रतिभावान स्टार कलाकार आहेत. ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्यामध्ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण, हृदयस्पर्शी सीन्सचा समावेश आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…