Marathi

मुलांनी लिव्ह इनमध्ये राहण्याच्या झीनम अमानच्या विधानावरुन जुंपले शीतयुद्ध, सायरा बानू आणि मुमताज यांच्या प्रतिक्रिया चर्चेत ( After Mumtaz, Now Saira Banu Speaks On Zeenat Aman’s Advocacy For Live-In Relationships)

जेव्हापासून झीनत अमानने सोशल मीडियावर प्रवेश केला, तेव्हापासून त्या तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाल्या आहे. झीनत आधुनिक नातेसंबंधांवर आणि आधुनिक जीवनातील समस्यांवर मोकळेपणाने बोलतात, ज्याचा तरुण वापरकर्ते खूप संबंध ठेवतात आणि या पोस्ट्स व चर्चेच्या माध्यमातून झीनत अमान तरुणांची आवडत्या बनल्या आहे. पण काही दिवसांपूर्वी झीनतने लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल असे काही सांगितले होते जे काही लोकांना आवडले नाही. या प्रकरणावर अभिनेत्री मुमताजने झीनत अमानला ट्रोल केले आहेय आणि दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.

काही दिवसांपूर्वी झीनत अमानने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, “लग्न करण्यापूर्वी लोकांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी माझ्या मुलांनाही हाच सल्ला देते. एखाद्याला तासनतास आपले सर्वोत्तम देणे सोपे आहे, परंतु दररोजच्या गोष्टींमध्ये एकत्र राहणे हीच खरी परीक्षा आहे.”

जेव्हा मुमताजला एका मुलाखतीत झीनत अमानला लिव्ह-इनचे समर्थन करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा मुमताज म्हणाल्या की, झीनत अमानला नातेसंबंधांवर सल्ला देण्याचा अधिकार नाही, कारण तिचे मजहर खानसोबतचे लग्न नरकापेक्षा कमी नव्हते. ती मजहर खानला लग्नाआधीही अनेक वर्षांपासून ओळखत होती. तरीही त्यांचे लग्न तुटले. असा सल्ला देऊन झीनत मस्त आंटी बनण्याचा प्रयत्न करत असून तिला इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स वाढवायचे आहेत, असेही मुमताजने म्हटले होते.

पुढे झीनतनेही यावर प्रतिक्रिया दिली, “प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मी इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारी किंवा माझ्या सहकाऱ्यांचा अपमान करणारी कधीच नव्हती आणि आताही करणार नाही.”

आता या दोन्ही अभिनेत्रींमधील शब्दयुद्धात सायरा बानोनेही उडी घेतली असून आपण झीनत अमानच्या शब्दांना समर्थन देत नसल्याचे म्हटले आहे. सायरा बानू म्हणाल्या, “मी हे कधीच मान्य करू शकत नाही. आमचा काळ 40-50 वर्षांपूर्वीचा आहे. मी अशा प्रकारे लिव्ह-इन रिलेशनशिपचा पुरस्कार कधीच करणार नाही. माझ्यासाठी “असे नातेसंबंध अकल्पनीय आणि अस्वीकार्य आहेत.”

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

व्यंग्य- आप कुछ समझते क्यों नहीं? (Satire- Aap Kuch Samjhte Kyon Nahi?)

बॉस थक जाते हैं, कहते है, “यार ये कुछ समझाता क्यों नहीं."और मुझे लगता है,…

July 22, 2024

श्रावण मास पर विशेष: कहानी- हम में शक्ति हम में शिव… (Short Story- Hum Mein Shakti Hum Mein Shiv…)

तभी मां जो शिव की अनन्य भक्त थीं, बोलीं, ''बेटा! जहां ईश्वर हों, वहां आस्था…

July 22, 2024
© Merisaheli