वाळवी नंतर परेश मोकाशी ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा नवीन सिनेमा घेऊन आले आहेत. ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे टिझर नुकतेच प्रदर्शित झाले असून ते चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
‘आत्मपॅम्फ्लेट’ हे चित्रपटाचे नाव ऐकायला वेगळे वाटते. तरीली या नावात काय दडलंय याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळेल. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित ‘आत्मपॅम्फ्लेट’चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत. त्यामुळे या चित्रपटाशी अनेक नामवंत नावे जोडली गेली आहेत.
आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. परेश मोकाशींनी हा सिनेमा लिहीला आहे.
दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, “चित्रपटाचे नाव असे का आहे, ते टिझरमध्ये स्पष्ट कळत आहे. खूप साधी, सरळ आणि मनाला भावणारी अशी ही कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनाच्या काळात झाले होते. त्याचबरोबर इतर असंख्य आव्हानं असतानाही चित्रपटाच्या टीमने मनापासून काम केले आणि चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे. याचे सारे श्रेय संपूर्ण टीमचे आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’मधील पात्रांपैकी एखादे पात्र तरी बालपणी आपल्यात, आपल्या मित्र मैत्रिणीत दडल्याचे प्रेक्षकांना जाणवेल. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राईडसारखी, तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. सर्व वयोगटासाठी हा चित्रपट आहे.”
२०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच वाळवी सिनेमा आला अन् प्रचंड गाजला. माऊथ पब्लिसीटीच्या जोरावर वाळवीने चांगलंच यश मिळवलं. परेश मोकाशी यांनी वाळवीचं दिग्दर्शन केलं होतं. आता ‘आत्मपॅम्फ्लेट’ ही गाजेल निश्चित.
60 और 70 के दशक के पॉपुलर एक्टर जूनियर महमूद (Junior Mehmood) इस वक्त पेट…
चित्रपट निर्मात्या झोया अख्तरचा बहुप्रतिक्षित चित्रपट द आर्चीजचा भव्य प्रीमियर मुंबईत झाला. प्रीमियरला संपूर्ण बॉलीवूडने…
ऋतिक रोशन अपनी लवलेडी के संग ज़ोया अख्तर की फिल्म द आर्चीज के प्रीमियर पर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात…
'फायटर' चित्रपटातील, 'ग्रूप कॅप्टन राकेश जय सिंग'च्या भूमिकेतील अनिल कपूरच्या लूकची झलक समोर आली आहे.…
अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘ॲनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय.…