FILM Marathi

ऐश्वर्याचे रणबीर कपूरसोबत बोल्ड फोटो पाहून भडकलेले बच्चन कुटुंबीय (Aishwarya Rai did a Glamorous Photoshoot, Amitabh Bachchan got Angry after Seeing It)

सौंदर्याची खाण ऐश्वर्या राय बच्चन लाखो हृदयांवर राज्य करते. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे आणि निळ्याशार डोळ्यांचे दिवाणे आहेत. आपल्या सौंदर्याची जादू देशातच नाही तर परदेशातही पसरवणारी ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि लग्नानंतर ती काही काळ पडद्यापासून दूर राहिली आणि तिच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करू लागली, परंतु त्यानंतर काही वर्षांनी ती इंडस्ट्रीत परतली. इंडस्ट्रीत परतल्यानंतर तिने रणबीर कपूरसोबत ग्लॅमरस फोटोशूट केले तेव्हा तिचे बोल्ड पोज पाहून सासरे अमिताभ बच्चन तसेच संपूर्ण कुटुंब संतापले होते.

पडद्यावर पुनरागमन केल्यावर ऐश्वर्या राय बच्चनने 2015 मध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मासोबत ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात काम केले होते. त्याच वेळी, तिने रणबीर कपूरसोबत फोटोशूट केले होते, ज्यामध्ये अभिनेत्यासोबत तिची कामुक पोज पाहून संपूर्ण कुटुंब तिच्यावर खूप संतापले होते.

फोटोशूट व्यतिरिक्त या चित्रपटात ऐश्वर्या रायने रणबीर कपूरसोबत भरभरून बोल्ड सीन्स दिले होते, ज्यामुळे अमिताभ बच्चन आणि सासू जया बच्चन चांगलेच संतापले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा ऐश्वर्या आणि रणबीरचे बोल्ड फोटोज समोर आले होते, तेव्हा त्या फोटोंनी खळबळ उडवून दिली होती.

चित्रपटातील सुनेचा बोल्ड सीन पाहून बच्चन कुटुंब आधीच संतापले होते, पण नंतर तिचे फोटो समोर आल्यानंतर कुटुंबीयांची नाराजी वाढली. या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या रायने रणबीरला मिठी मारून सेक्सी पोज दिल्या.

रणबीर आणि ऐश्वर्या राय यांच्यातील बोल्ड केमिस्ट्रीने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होती, परंतु अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाला हे फोटो अजिबात आवडले नाही. बिग बी आणि ऐश्वर्याच्या सासू जया बच्चन यांनी आपल्या सुनेच्या या बोल्ड फोटोंवर आक्षेप घेतला होता, मात्र या मुद्द्यावर कोणीही उघडपणे बोलले नाही, असे म्हटले जाते.

विशेष म्हणजे लग्नानंतर ऐश्वर्या राय बच्चनने पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात असे बोल्ड सीन्स दिले होते. लग्नानंतर ऐश्वर्या रायची बोल्ड स्टाईल तिच्या घरच्यांना आवडली नाही. ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेत्री नुकतीच ‘पोनियान सेल्वन 2’ मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- कंकाल (Short Story- Kankal)

सुषमा मुनीन्द्र कई कुरूप हुए हैं, जिन्होंने अपने क्षेत्र में नाम कमाया. इतना नाम कमाया…

February 8, 2025

Jewel Chief

Mix contemporary style with chic, desi looks and you’ll soon have heads turning in awe!…

February 8, 2025
© Merisaheli