Marathi

दृश्यममधील अजय देवगणची मुलगी झाली आई, दिला गोड मुलाला जन्म (Ajay Devgan’s daughter from Drushyam become a mother, give birth to a sweet boy)

इशिता दत्ता आणि वत्सल शेठ हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. आता त्यांच्या आयुष्यात एक नवा पाहुणा आला आहे. इशिता दत्ताने १९ जुलै रोजी मुलाला जन्म दिला. ईटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघेही बरे असून अभिनेत्रीला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
इशिता दत्ताने तिच्या गरोदरपणात तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना आणि फॉलोअर्सना नेहमीच अपडेट केले होती. मंगळवारी, अभिनेत्रीने एक सेल्फी शेअर केला आणि लिहिले, ‘ठीक आहे, शेवटा महिना सोपा नाही.’


२८ नोव्हेंबर २०१७ रोजी अभिनेत्रीने तिचा ‘बाजीगर’ मधील सह-अभिनेता वत्सल शेठसोबत लग्नगाठ बांधली. या वर्षी ३१ मार्च रोजी, या जोडप्याने ते त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची तयारी करत असल्याचे घोषित केले. त्यांनी कलर-ऑर्डिनेटेड पोशाख घालून फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये वत्सल इशिताच्या बेबी बंपकडे टक लावून पाहत होता.
इशिता दत्ताचे डोहाळे जेवण


काही दिवसांपूर्वी इशिता दत्ताच्या आईने अभिनेत्रीसाठी डोहाळे जेवणाचे आयोजन केले होते. इशिताने तिच्या बंगाली बेबी शॉवरचा एक व्हिडिओ शेअर केला ज्याला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळाले. इशिताने फंक्शनसाठी गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli