बॉलीवूडच्या खिलाडी कुमारचे म्हणजेच अक्षय कुमारचे चाहते त्याच्या शानदार अभिनयाचे आणि दमदार संवादाचे जितके कौतुक करतात तसेच ते त्याच्या सामाजिक कार्यासाठीही त्याला पसंत करतात.
अलीकडेच या बॉलीवूड सुपरस्टारने अयोध्या ट्रस्टला एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीतून अक्षय कुमारने अयोध्येतील राम लल्लाच्या वानरांना रोज खाऊ घालण्याची जबाबदारी घेतली आहे.
प्रभू रामाना रावणावर विजय मिळवून देणारे हे वानर अन्नासाठी भुकेले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने या वानरांना रोज खायला घालण्याची जबाबदारी घेतली आहे. अक्षय कुमारने या वानरांच्या मदतीसाठी देणगी देऊन अयोध्या ट्रस्टला हातभार लावला आहे.
जगत्गुरु स्वामी राघवाचारीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनेय सेवा ट्रस्ट चालवत आहे. ही ट्रस्ट अनेक वानरांना पोसण्याचे काम करते. या मिशनसाठी जेव्हा या ट्रस्टने अक्षय कुमारशी संपर्क साधला तेव्हा अक्षय त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आणि अक्षय कुमारने या मिशनसाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली.
अंजनेय सेवा ट्रस्टच्या संस्थापिका प्रिया गुप्ता म्हणतात – मला माहित आहे की अक्षय कुमार खूप दयाळू आणि चांगला माणूस आहे. केवळ सुपरस्टारच नाही तर त्याचा स्टाफ, क्रू, त्याच्यासोबत काम करणारे को-स्टार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही या उदात्त कार्यात मदत केली आहे.
अक्षयने त्याचे आई-वडील हरी ओम-अरुणा भाटिया आणि सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने ही देणगी दिली आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…