मेगास्टार आणि बॉलिवूडचा बादशहा अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत अविरत काम करत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही बिग बी आपल्या उत्साहाने तरुण कलाकारांना स्पर्धा देतात. चित्रपटांमध्ये आपली कारकीर्द सुरू ठेवत असताना, बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ शो होस्ट करत आहेत, सध्या ते ‘केबीसी 15’ होस्ट करत आहेत. अनेकदा चाहत्यांसह मजेदार किस्से शेअर करतात. शोमध्ये ते काही स्पर्धकांच्या भावना ऐकतात आणि काही वेळा आपल्या भावना सर्वांसोबत शेअर करतात. अलीकडेच बिग बींनी त्या दिवसांची आठवण काढली जेव्हा त्यांना चालता बोलता येत नव्हते.
‘KBC 15’ च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा सांगितला, एकेकाळी त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्या वेदनादायक काळाची आठवण करून देताना ते म्हणाले की, या आजारामुळे त्यांना बोलता येत नाही आणि चालणेही कठीण झाले होते. त्या कठीण काळात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी खूप मदत केली होती.
अमिताभ बच्चन यांनी ही घटना सांगितली जेव्हा श्रीदेव वानखेडे नावाचा स्पर्धक त्यांच्या समोर हॉट सीटवर बसला होता. लाइफलाइनचा वापर करून श्रीदेवने 12 लाख 50 हजार रुपये काढले होते. त्याचवेळी श्रीदेव वानखेडे यांनी सांगितले की, अपघातामुळे ते अपंग झाले, त्यामुळे नैराश्येत गेले, परंतु पत्नी आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे ते त्या टप्प्यातून बाहेर येऊ शकले.
श्रीदेव वानखेडेची कहाणी ऐकून सगळेच भावूक झाले, मग बिग बींनाही त्यांच्या आयुष्यातील तो कठीण काळ आठवला, जेव्हा ते मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या स्नायूंच्या आजाराचे बळी ठरले होते. त्याने सांगितले की, ते एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना सेटवर अचानक बेशुद्ध पडले. वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना स्नायूंच्या विकाराशी संबंधित मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या आजाराने ग्रासल्याचे दिसून आले.
त्यांनी सांगितले की या आजारामुळे त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना चालताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. इतकंच नाही तर बोलण्यात आणि चालण्यात त्रास होण्यासोबतच त्यांना डोळे बंदही करता येत नव्हते. मनमोहन देसाई यांनी त्यांना या कठीण काळात खूप साथ दिली आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना खूप धीर आला.
अमिताभ बच्चन यांच्या आधी अभिनेता-दिग्दर्शक टीनू आनंद यांनीही त्यांच्या आजाराविषयी सांगितले होते. ते म्हणाले होते की, बिग बींना या आजाराची माहिती ते मर्द या चित्रपटाचे शूटिंग करत असताना दिली होती. आणि त्यानंतर ते शहेनशाहच्या शूटिंगसाठी जाणार होते.
ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए आर रहमान यांच्या वैयक्तिक आयुष्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत…
kinky and raw sex may be good to ignite the carnal fire between two individuals,…
ऑस्कर अवॉर्ड विजेता संगीतकार एआर रहमान (AR Rahman) की पर्सनल लाइफ से एक शॉकिंग न्यूज…
ये धड़कनें भी अजीब हैंकभी-कभी बेवजह धड़कती हैंसांस लेने के लिएदिल पूछता हैजब तुम नहीं…
राजेश मां की बातें सुन कर आश्चर्य एवं आक्रोश से कह उठा, "मां, कई वर्षो…
स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अपनी फिल्मों को लेकर कम और विवादों को लेकर ज्यादा सुर्खियों…