FILM Marathi

एमी जॅक्सनने बर्फाळ प्रदेशात अत्यंत रोमॅण्टिक पद्धतीत केला बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा (Amy Jackson Announces Engagement With Boyfriend Ed Westwick, Shares Romantic Pictures)

अभिनेत्री एमी जॅक्सनने तिचा बॉयफ्रेंड अभिनेता एड वेस्टविकसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर तिच्या अनोख्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. ॲमी गेल्या दोन वर्षांपासून हॉलिवूड अभिनेता एड वेस्टविक याला डेट करत होती. आता ते दोघेही स्वित्झर्लंडच्या सुंदर बर्फाळ खोऱ्यात सहलीला गेलेले.

एमीने काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये एड तिला गुडघ्यावर बसून हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज करत असल्याचे दिसून येते आणि अभिनेत्रीनेही विलंब न करता त्याला हो म्हटले. पुढे अभिनेत्रीने काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. एमीने पांढरा पोशाख घातला आहे आणि एडने हिरवा रंगाचा पोशाख घातला आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

याआधीही एमीने बिझनेसमन जॉर्ज पनायोटौशी लग्न केले होते आणि दोघांनाही एक मुलगा आहे – अँड्रियास. दोघेही 2020 मध्ये लग्न करणार होते पण त्यांचे ब्रेकअप झाले, पण आता एमी पुढे गेली आहे.

एडला गॉसिप गर्ल या सिरीजमुळे प्रसिद्धी मिळाली, तर एमीने दक्षिणेव्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपट केले आहेत, जसे की एक दीवाना था, 2.0, सिंग इज ब्लिंग इत्यादी. ॲक्शन थ्रिलर क्रॅकमध्येही एमी दिसणार आहे.

अनेक सेलेब्स आणि चाहते एमीला तिच्या एंगेजमेंटबद्दल शुभेच्छा देत आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

‘पीकू’ की दोबारा रिलीज़ पर इमोशनल नोट के साथ दीपिका पादुकोण ने इरफान खान को याद किया… (Deepika Padukone remembers Irrfan Khan with an emotional note on the re-release of ‘Piku’…)

अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर फिल्म ‘पीकू’ साल 2015 में आई थी. पिता-पुत्री…

April 19, 2025

कहानी- आसमान साफ़ है (Short Story- Aasman Saaf Hai)

"हमेशा अपने बच्चों की मां बनकर जीने के अलावा नारी को कभी-कभी अपने पति की…

April 19, 2025
© Merisaheli