फिल्मी चक्कर

अंकिता लोखंडेचा पतिसोबतचा व्हिडिओ पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले अश्लीलतेच्या सर्व मर्यादा पार (Ankita Lokhande Gets Brutally Trolled For Posting Romantic Video With Hubby Vicky Jain)

लग्नानंतर अंकिता लोखंडे खूप आनंदी दिसत असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत अर्चना म्हणून अंकिता लोकांना खूप आवडली होती. तेव्हा सुशांत सिंह राजपूत तिच्यासोबत होता. त्यावेळेस दोघांनाही एक कपल म्हणून खूप प्रेम मिळाले, पण सुशांतच्या मृत्यूनंतर लोकांनी अंकिताला अनेकदा ट्रोल केले. कधी तिला आनंदी पाहून तर कधी विकी जैनसोबतच्या लग्नाबाबत लोकांनी तिच्यावर ताशेरे ओढले.

अंकिताने पती विकीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर पुन्हा तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. अंकिता या व्हिडिओत विकी कौशलच्या तू है तो मुझे फिर और क्या चाहिए या गाण्यावर अभिनय केला आहे आणि नवऱ्याला मिठी मारत आहे. पण लोकांना विकीचे एक्सप्रेशन आणि अंकिताची मांडीवरची पोज आवडली नाही.

अंकिताचे चाहतेही तिच्यावर नाराज होते. अंकिता आम्हाला तू आवडतेस पण असे व्हिडिओ सहन करू शकत नाही, असे युजर्स म्हणत आहे. एका युजरने लिहिले – अपवित्र नाते, एकाने सांगितले की कॅमेरा बंद करून ही छिछोरापंती करा.

लोक अभिनेत्रीला खूप ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले – 100% नवरा प्रेम करत नाही, त्याने तुमचा प्रसिद्धीसाठी वापर केला आहे. खरे प्रेम असते तर त्याने असा घाणेरडा व्हिडीओ बनवला नसता आणि तुम्हाला बनवू दिला नसता. पुढील 2 वर्षांत घटस्फोटाची घोषणा होईल.

एकाने लिहिले आहे – तुम्ही हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी करत आहात, पैशासाठी तुम्ही या माणसाशी लग्न केले आहे. यूजर्स याला अश्लीलतेची मर्यादा मानत आहेत आणि अंकिताला खूप काही सुनावत आहेत. हे सर्व कॅमेऱ्यासमोर जनतेला दाखवण्याची काय गरज आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

पैरेंट्स के आपसी रिश्ते तय करते हैं बच्चे का भविष्य (Relationship Between Parents Decides The Future Of The Child)

गर्भावस्था में मां की सेहत व मनःस्थिति का प्रभाव तो शिशु पर पड़ता ही है,…

May 18, 2024

सारा अली खान की हुई सगाई, बिजनेसमैन संग जल्दी ही रचाएंगी शादी, खबर पक्की है (Sara Ali Khan is engaged; will tie the knot this year: Reports)

पटौदी खानदान की लाडली और सैफ अली खान- अमृता सिंह की बेटी सारा अली खान…

May 18, 2024

पारू आणि आदित्यचं लग्न झालं? …; ‘पारू’ मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो (Paru And Aditya Wedding Paaru Serial New Promo Viral)

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या…

May 18, 2024

इम्रान आणि लेखाच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम (Imran Khan Girlfriend Lekha Washington Shared first Romantic Photo)

इम्रानने त्याच्या आणि लेखाच्या डेटिंगबद्दल सांगितल्यानंतर सोशल मीडियावर या कपलची ही पहिलीच अधिकृत पोस्ट आहे.…

May 18, 2024

मिनिटांत लपवा चेहऱ्यातील दोष (Remove Facial Defects In Minutes)

मेकअपच्या मदतीने चेहर्‍यातील दोष लपवून मिनिटांत परफेक्ट लूक मिळवता येतो. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.प्रत्येक…

May 18, 2024
© Merisaheli