Beauty Marathi

मिनिटांत लपवा चेहऱ्यातील दोष (Remove Facial Defects In Minutes)

मेकअपच्या मदतीने चेहर्‍यातील दोष लपवून मिनिटांत परफेक्ट लूक मिळवता येतो. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.
प्रत्येक जण नाकीतोंडी परफेक्ट असतोच, असं नाही. कुणाचे डोळे सुंदर असतात, तर नाक मोठं-पसरट असतं. कुणाचं कपाळ प्रमाणबद्ध असतं, तर ओठ मोठे असतात. संपूर्ण चेहरा प्रमाणबद्ध आणि आखीव-रेखीव असलेली एखादीच ऐश्‍वर्या राय असते. पण म्हणून इतरांना सुंदर दिसण्याचा हक्क नाही, असं नाही. आपले नाक, डोळे, ओठ, कपाळ कसंही असलं तरी योग्य प्रकारे मेकअप करून तुम्हीही परफेक्ट दिसू शकता, तेही अगदी काही मिनिटांत. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.

डोळे लहान आहेत?
तुमचे डोळे अगदी लहान असतील आणि काजळ लावल्यानंतर चांगले दिसत नसतील, तर तुम्हाला आय मेकअपची पद्धत बदलायला हवी. तुम्ही पांढर्‍या रंगाच्या आय पेन्सिलचा वापर करा. यामुळे तुमचे डोळे मोठे दिसू लागतील. तसंच आय लायनर अतिशय बारीक लावा. अशा प्रकारे तुमचे डोळे मोठे आणि सुंदर दिसतील.

कपाळ मोठं आहे?
बरेचदा कपाळ मोठं असलं की, योग्य हेअर स्टाईलची निवड करणं कठीण होतं. मोठं कपाळ लपवण्यासाठी फ्रिंज किंवा फ्लिक्स हेअर कटचा पर्याय निवडायला हवा. याद्वारे तुमच्या कपाळाची लांबी लपवता येईल.

ओठ जाड आहेत?
ओठ जाड असले की, कोणत्या रंगाची लिपस्टिक लावावी हा प्रश्‍न हमखास सतावतो. अशा मुलींनी लिप मेकअप विचारपूर्वक करायला हवा. लिप मेकअप करण्यासाठी गडद रंगछटेची मॅट लिपस्टिक वापरा. तसंच लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप पेन्सिलच्या साहाय्याने ओठांच्या थोडं आतल्या बाजूने आऊटलाइन करा.

नाक पसरट आहे?
टोकदार सरळ नाक नेहमीच शोभून दिसतं. तुमचं नाक तसं नसलं, तरी हरकत नाही. मेकअपच्या मदतीने तुम्ही स्वतःचं नाक तसं करू शकता. त्यासाठी मेकअप करताना गडद तपकिरी रंगछटेने नाकाची कंटोरिंग (लांबीमध्ये) करा. यामुळे तुमचं नाक बारीक दिसेल. नाका प्रमाणेच तुम्ही चिकबोन्सचीही कंटोरिंग करू शकता.

चिकबोन्स उभारलेले आहेत?
चिकबोन्स मुळातच उभारलेले असले की, थोडा जरी ब्लशर वापरला की ते अधिकच हायलाइट होतात. अशा वेळी सॉफ्ट मेकअप करायला हवा. ब्लशरही गुलाबी किंवा पिच यासारख्या सौम्य रंगछटेचा लावला पाहिजे. तसंच चिकबोन्स झाकले जातील अशा प्रकारे हेअर स्टाईल केली पाहिजे.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

इन बीमारियों में प्रेग्नेंसी हो सकती है रिस्की (Pregnancy Can Be Risky In These Diseases)

मां बनना हर नारी का सपना होता है. लेकिन क्या आप जानते हैं कि कुछ…

May 1, 2024

कहानी- मुझे चांद चाहिए (Short Story- Mujhe Chand Chahiye)

"दवाई क्यों देंगे रिया? डॉल को चोट लगी है क्या?" उसकी सहेली चिंता से भर…

May 1, 2024

अनुपमा फेम रुपाली गांगुली ने रखा राजनीति में कदम, एक्ट्रेस ने ज्वॉइन की ये राजनीतिक पार्टी (Actress Rupali Ganguly Of ‘Anupamaa’ Fame Joins BJP)

साराभाई वर्सेज साराभाई और अनुपमा जैसे पॉपुलर टीवी शो से घर घर में पहचान बनाने…

May 1, 2024

पोटच्या बाळाला निरोप देऊन त्याला अग्नीत सोपन्याहून मोठे दु:ख ते काय? शेखर सुमन शेअर केली कटू आठवण ( Shekhar Suman Express His Feeling About For Late Son Ayush )

शेखर सुमन यांनी एबीपी लाइव्ह एंटरटेनमेंटशी संवाद साधताना आपल्या दिवंगत मुलाचा उल्लेख करुन ते भावूक…

May 1, 2024
© Merisaheli