२०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण सिनेइंडस्ट्री जबर धक्का बसला होता. अंकिता लोखंडे सध्या सलमान खानच्या ‘बिग बॉस १७’ या रिअॅलिटी शोमध्ये पती विकी जैनसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. याशोमध्ये अंकिता अनेकदा सुशांतचा उल्लेख करत असते.
बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी ‘बीबीसी न्यूज हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सर्व गोष्टी पूर्वी सारख्या सुरळीत होतील असे तिला वाटले होचे पण तसे घडत नव्हते. त्यामुळे ३१ जानेवारी रोजी तिने मुव्ह ऑन व्हायचा निर्णय घेतला. ती म्हणाली की माझ्या घरात सुशांत व माझे खूप फोटो होते. ते सर्व फोटो मी आईला काढून टाकण्यास सांगितले. कारण मला माझ्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीसाठी जागा बनवायची होती.
जोपर्यंत सुशांत आहे तोपर्यंत कोणीही माझ्या आयुष्यात येऊ शकणार नाही असे मी माझ्या आईला सांगितलेले. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले आणि माझ्या आईने फोटो काढून सर्व फाडले. मी त्या दिवशी खूप रडली. तेव्हा माझ्या आणि सुशांतमधील सर्व काही संपले होते. ती म्हणाली की तिने खूप वाट पाहिली, सर्व काही केले आणि ६ महिन्यांनंतर विकी जैन तिच्या आयुष्यात आला. दोघांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले.
सुशांतने कधीच त्याच्या आणि अंकिताच्या नात्याबद्दल सांगितले नाही. त्यानंतर तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याचे समोर आलेले. किंबहूना त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल रियाला कारणीभूत ठरवण्यात आलेले.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…