अभिनेता भूषण प्रधानने नुकताच त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची जवळची मैत्रिण अनुषा दांडेकरने त्याच्यासाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल होत आहे. त्याचबरोबर तो चर्चेतही आला आहे.
अनुषाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आतापर्यंत त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले आनंदी क्षण पोस्ट केले आहेत. सोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भुशी! येणारं प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी नवीन साहस आणि उत्तम काळ घेऊन येवो. तू खूप टॅलेंटेड आणि हुशार आहेस आणि तुझी हुशारी जगातील प्रत्येकाला लवकरात लवकर कळावी अशी माझी इच्छा आहे. मला कायम हसवल्याबद्दल तुझे आभार. माझ्या आवडीच्या छोट्या छोट्या गोष्टी दिल्याबद्दल तुझे आभार. तुझं मन खूप मोठं आहे. तू एक खरा माणूस, चांगला माणूस, चांगला भाऊ, एक खूप छान मित्र आणि तुझ्यातील याच गोष्टी मला खूप आवडतात. तू सर्वांवर मनापासून प्रेम करतोस, आपले स्वभाव जुळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा स्वभाव खूप खरा आहे आणि हा खरेपणा कायम जूपन ठेव. मी तुला फक्त वर्षभर ओळखतेय पण आता हे वर्ष शंभर वर्षाइतकं वाटतंय. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना? लव्ह यु! भूषण प्रधान.”
पोस्टमध्ये अनुषाने लव्ह यु लिहिल्यामुळे अनुषाने तिच्या रिलेशनशिपची कबुली दिल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. अनुषा आणि भूषणने जुनं फर्निचर या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवरच त्यांची जोडी जमली. आता या जोडीनं लवकरात लवकर लग्न करावं याची चाहत्यांनी मागणी केली आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…