‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनुष्का सेन हिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी मुंबईत आलिशान घर विकत घेतलं आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले आहेत.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अनुष्का सेनने वयाच्या 22 व्या वर्षी मुंबईत हक्काचं घर विकत घेतलं आहे. या गृहप्रवेशाचे आणि पुजेचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनुष्का सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास चार कोटी फॉलोअर्स आहेत.
नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे, पुजेचे आणि होमहवनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘गृहप्रवेश, नवी सुरुवात, नवं घर.. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे’, असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
अनुष्काने ‘बालवीर’, ‘झांसी की रानी’, ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 11’, ‘दिल दोस्ती डिल्लेमा’ यांसारख्या मालिका आणि शोजमध्ये काम केलंय. अनुष्का लवकरच एका कोरियन ड्रामामध्येही झळकणार आहे.
गेल्या वर्षी अनुष्काची कोरियन पर्यटनाची मानद राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ती ‘एशिया’ नावाच्या तिच्या पहिल्या कोरियन चित्रपटासाठी शूटिंगदेखील करत आहे.
‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला (Kaanta Laga Girl Shefali Jariwala) अब इस दुनिया में (Shefali…
बोनी कपूर (Boney Kapoor) की बेटी और अर्जुन कपूर (Arjun Kapoor) की बहन अंशुला कपूर…
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…