Marathi

पाच वर्षात एकही चित्रपट केला नाही तरीही अनुष्का आहे कोट्यावधींची मालकीण(Anushka Sharma is Away from Silver Screen from Last Five Years, Yet There is no Effect on Her Income)

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अनुष्का शर्मा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटाच्या पडद्यावरून गायब आहे, परंतु तिच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही किंवा तिच्या उत्पन्नावरही कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. अनुष्काचे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अभिनेत्री तब्बल पाच वर्षांनी ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे.  अभिनेत्री गेल्या पाच वर्षांपासून चित्रपटाच्या पडद्यावरून गायब आहे आणि या काळात तिचा एकही चित्रपट आला नाही, तरीही तिच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झालेला नाही. अखेर कसे? चला जाणून घेऊया.

गेल्या काही वर्षांत अनुष्का शर्माचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरीही ती करोडोंची कमाई करते. तिच्याकडे अनेक आलिशान घरे आहेत, आलिशान वाहनांचा मोठा संग्रह आहे. तिची एकूण संपत्ती 255 कोटींच्या आसपास आहे. अनुष्का 2018 पासून चित्रपटाच्या पडद्यावरुन गायब आहे, परंतु तिची कमाई कायम आहे.

एका चित्रपटासाठी अनुष्का 10 ते 12 कोटी रुपये घेते, असे म्हटले जाते. चित्रपटांव्यतिरिक्त, ती ब्रँड एंडोर्समेंटद्वारे भरपूर कमाई करते. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का एका जाहिरातीसाठी जवळपास 3 कोटी रुपये फी घेते. अनुष्का ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ नावाच्या प्रोडक्शन हाऊसची मालकही आहे. तिने तिच्या प्रोडक्शन बॅनरखाली ‘NH10’, ‘फिल्लौरी’ आणि ‘परी’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अनुष्काने अनेक नावाजलेल्या कंपन्यांमध्ये करोडोंची गुंतवणूक केली आहे, ज्याद्वारे अभिनेत्री भरपूर पैसे कमवत आहे. अनुष्काचे मुंबईत सी-फेसिंग आलिशान घर आहे, ज्याची किंमत 34 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीने अलिबागमध्ये एक फार्महाऊस देखील घेतला आहे, ज्याची किंमत सुमारे 19.24 कोटी रुपये आहे.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा कारची शौकीन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे. अनुष्का ऑडी, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू आणि बेंटले सारख्या लक्झरी वाहनांची मालक आहे, ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे. अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची शाहरुख खानच्या 2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. आता 5 वर्षांनंतर ती ‘चकडा एक्सप्रेस’मधून पुनरागमन करत आहे. हा एक बायोपिक आहे, ज्यामध्ये अनुष्का शर्मा महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, तिचे प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli