शाहरुखसोबत काम करण्यासाठी सर्वच कलाकार आतुर असतात. पण टीव्हीवरील एका अभिनेत्रीने शाहरुख खानसोबतचा शो फ्लॉप झाल्याचे म्हटले आहे.
टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनने शाहरुखसोबत रिअॅलिटी शोमध्ये काम केले होते. पण तिच्या मते हा शो तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप शो होता. ‘भाभीजी घर पर हैं’ या प्रसिद्ध कॉमेडी मालिकेतील अनिता भाभी या पात्रासाठी सौम्या टंडन लोकप्रिय आहे. तिने ‘जब वी मेट’ चित्रपटातील रूप ढिल्लन हे पात्र साकारले होते. सौम्याने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबत ‘जोर का झटका: टोटल वाइपआउट’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालनही केले होते.
‘डिजिटल कॉमेंटरी’शी बोलताना अभिनेत्री सांगितले की, जेव्हा मला कळले की मी शाहरुख खानसोबत शो होस्ट करणार आहे, तेव्हा मला माझे करिअर सेट झाले असे वाटले होते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे तो शो चालला नाही. ‘हा शो माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप होता.’
सौम्या पुढे म्हणाली की, ‘’मी शाहरुख खानसोबत त्यावेळी मी खूप वेळ घालवला. ‘मला त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. तो सुद्धा अतिशय हुशार आहे. केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर तो खूप समजुतदार देखील आहे. हा शो करण्यापूर्वी मी त्याची फार मोठी चाहती नव्हती. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा माझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. जेव्हा मी त्याच्यासोबत तो शो करत होती तेव्हा शाहरुख माझा खूप आदर करायचा. मी या क्षेत्रात नवीन आहे अस त्याने मला कधीच वाटू दिले नाही.”
आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को मशीन…
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…
पापुलर टीवी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के पुराने रोशन सिंह उर्फ गुरुचरण सिंह…
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…
आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…
मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…