Marathi

मैने प्यार किया सिनेमाच्या पोस्टरवेळी भाग्यश्री होती गरोदर, सलमानने लठ्ठपणावर उडवली खिल्ली (Bhagyashree Was 5 Months Pregnant At Maine Pyar Kiya Movie Poster Shoot)

भाग्यश्रीने सूरज बडजात्याच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यात सलमान खान तिच्यासोबत होता. भाग्यश्रीसाठी हे स्वप्नवत पदार्पण होते कारण या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. आजही चाहते भाग्यश्रीची आठवण ‘मैने प्यार किया’साठी करतात. सुपरहिट पदार्पणानंतर भाग्यश्रीकडे चित्रपटांची रांग लागली होती. पण आणखी चित्रपट साइन करण्याऐवजी अभिनेत्रीने लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला. डेब्यूच्या वेळी भाग्यश्री हिमालय दासानीला डेट करत होती आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोघांनी लग्न केले.

‘रॅगिंग स्टार्स’ पुस्तकाच्या रश्मी उचील यांच्याशी बोलताना भाग्यश्रीने सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’च्या पोस्टरसाठी शूटिंग करतानाचा प्रसंग आठवला. भाग्यश्रीने सांगितले की, त्यावेळी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच माहिती नव्हती. सलमानलाही याची जाणीव नव्हती आणि त्याने लग्नानंतर लठ्ठ झाल्याची कमेंट अभिनेत्रीवर केली होती.

भाग्यश्रीने सांगितले की, ‘जेव्हा प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजदक्ष्याने ‘मैने प्यार किया’साठी माझ्या आणि सलमानसोबत फोटोशूट केले तेव्हा मी 5 महिन्यांची गरोदर होती. कोणालाही माहित नव्हते. मला आठवतंय की सलमान मला म्हणाला होता, ‘लग्नानंतर तू लठ्ठ झाली आहेस.’

भाग्यश्रीने सांगितले की, लग्नानंतर आणि मुले झाल्यानंतर तिने अभिनय सोडला आणि आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगी अवंतिकाला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीने काही तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. भाग्यश्रीने सांगितले की, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची शैली खूपच स्मूथ आहे. तिथे लोक शूटिंग शेड्यूल फॉलो करतात. शूटिंग सकाळी ९ वाजता सुरू होते आणि दुपारी १ वाजता जेवण होते. भाग्यश्रीच्या मते, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे तिच्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी नव्हते.

Akanksha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli