Entertainment

बिग बॉस फेम श्रीजिता डे ने बॉयफ्रेंडसोबत चर्चेमध्ये केले लग्न, पाहा फोटो (Big Boss-16 Fame Sreejita De Gets Married To Longtime BF Michael Blohm-Pape, See Wedding Pics)

टीव्ही अभिनेत्री श्रीजीताने जर्मनीतील एका चर्चमध्ये तिचा प्रियकर मायकेल बलोह्म पेपसोबत लग्नगाठ बांधली. लग्नात अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाच्या गाऊन परिधान केला होता. चर्चमधील लग्नाचे सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

बिग बॉस 16 फेम अभिनेत्री श्रीजीता डे हिने तिच्या लग्नाच्या दिवसासाठी ऑफ-शोल्डर पांढरा गाऊन निवडला होता. या गाऊनसोबत अभिनेत्रीने डायमंड नेकलेस घातला होता.

तर तिचा प्रियकर मायकेलने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. काळ्या सूटसोबत लाल बोमध्ये तो देखणा दिसत आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या चर्चमधील लग्नाच्या फोटोंमध्ये, नववधू श्रीजिता डे आणि मायकेल रिकाम्या चर्चमध्ये पोज देताना दिसत आहेत. एका फोटोत, चर्चच्या लग्नानंतर श्रीजिता डे मायकलसोबत लिप-लॉक केलेले पाहायला मिळते.

श्रीजीता डेने तिच्या चर्चमधील लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच, काही मिनिटांतच नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी लोकांचा ओघ सुरू झाला. अभिनंदन करणाऱ्यांमध्ये तिच्या मित्रांपासून ते अभिनेत्रीच्या चाहत्यांपर्यंतच्या समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीजीता आणि मायकल या वर्षाच्या अखेरीस बंगाली रितीरिवाजांसह लग्नाचे सर्व विधी पार पाडतील.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025
© Merisaheli