Relationship & Romance Marathi

पुरुषांना स्वतःच्या प्रशंसेमध्ये काय ऐकावयास आवडते? (Compliments men like to hear)

आपली प्रशंसा केलेली कोणाला आवडणार नाही? प्रशंसेचे दोन गोड शब्द ऐकले की आपलं आपल्यालाच कौतुक वाटू लागतं. लहान-मोठ्या अशा कोणत्याही कामाचं कौतुक झालं की लगेचच मनुष्यास अजून जोमानं काम करण्यास उत्साह वाटतो. मनुष्यस्वभावच आहे असं म्हटल्यानंतर मग पुरुषही याला अपवाद नाहीत. पुरुष हे स्वभावाने थोडे कठोर असतात असं म्हटलं जातं. पण मनाने ते देखील हळवे असतात आणि स्वतःच्या प्रशंसेने त्यांच्यातही आनंदाचं वारं शिरतं. पाहुया पुरुषांना स्वतःच्या प्रशंसेमध्ये काय ऐकावयास आवडते?

आज तुम्ही अतिशय स्मार्ट दिसत आहात

आपल्या दिसण्याची प्रशंसा केलेली महिलांनाच नाही तर पुरुषांनाही आवडते. डॅशिंग लूक, हेअर स्टाईल, ब्रँडेड चपला आणि घड्याळ यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी मिळालेली कॉम्प्लीमेंट पुरुषांना अतिशय आवडते. एवढंच नव्हे तर कपडे खरेदी करताना वा सौंदर्य प्रसाधने घेताना इतर कोणी त्यांचं मत विचारलं, त्यांची मदत घेतली तरी त्यांना आनंद वाटतो.

तुम्ही मदतनीस आहात

नेहमी दुसऱ्यांचा विचार करणे, सहकाऱ्यांसोबत एकत्रितपणे काम करणे, सगळ्यांना मदत करणे हे पुरुषांचे स्वभावगुण आहेत. याबद्दल जर त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांना कौतुकाची थाप मिळाली तर त्यांना आवडतं. परंतु अशा प्रकारची प्रशंसा जर त्यांना महिलांकडून मिळाली तर त्यांची छाती गर्वाने फुलून जाते.

तुमची विनोदबुद्धी अतिशय चांगली आहे

हुशार, हजरजबाबी, बिनधास्त पुरुष सगळ्यांना आवडतात. कोठेही गेले तरी ते त्यांची छाप पाडल्याशिवाय राहणार नाहीत. असे पुरुष समारंभाची शान असतात. त्यांना ओळखणाऱ्या, त्यांना भेटणाऱ्या व्यक्तींपैकी कोणी जर त्यांना ही कॉम्प्लीमेंट दिली तर त्या पुरुषांना भरून येतं. ते हळवे होतात.

तुम्ही कामाच्याबाबत एकदम आदर्श आहात

कामाच्या क्षेत्रात जर पुरुषांना त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी बॉसकडून वा सहकाऱ्याकडून वा आपल्याला सिनिअर असलेल्या व्यक्तीकडून वाहवा मिळाली, तर ते पुरुष उत्साहित होतात. आपल्या कामाची प्रशंसा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते.

तुम्ही खरोखर खुप हुशार आहात

नोकरी, व्यवसाय वा आपल्या कामाव्यतिरिक्त एखादा खास गुण तुमच्यात आहे आणि त्यात तुम्ही मातब्बर आहात. हे ओळखून जर कोणी तुमची स्तुती केली तर तुम्हाला ते आवडते. समाजसेवा, गायन, लेखन आणि खेळ अशा कोणत्याही क्षेत्रातील कौशल्याचं कौतुक झालेलं पुरुषांना आनंद देतं शिवाय या गोष्टींमध्ये अधिक प्राविण्य मिळविण्यासाठी प्रोत्साहनही देतं.

आज तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात

महिला विशेषतः प्रेयसीकडून तुम्ही आज खूप सुंदर दिसता ही कॉम्प्लीमेंट मिळाली तर ते पुरुष काही तास नव्हे, काही दिवस नाही तर महिनाभर आनंदी राहू शकतात. सध्याच्या जमान्यात आपल्या सहकाऱ्यांकडूनही जर अशी प्रशंसा ऐकावयास मिळाली तर पुरुष अतिशय खूश होतात.

तुम्ही वयाने लहान दिसता

पुरुषांना आपल्या वयापेक्षा लहान दिसणे आवडते आणि ही कॉम्प्लीमेंट जर महिलेने दिली तर मग सोन्याहून पिवळं असंच म्हणावयास हवं.

तुम्ही प्रेमळ आणि काळजी घेणारे आहात

तुम्ही अतिशय प्रेमळ आणि काळजी घेणारे आहात असं जर पुरुषांना त्यांची अर्धांगिनी,  मुलं, मित्र वा कलिग यापैकी कोणी बोललं तर त्या पुरुषांचं आत्मबळ वाढतं. आपल्या कुटुंबासाठी कर्ता पुरुष जे काही करतो, त्यावरून कुटुंबातील सदस्य जर त्यांना प्रेमळ वा काळजी करणारे मानत असतील तर अजून काय अपेक्षा असणार त्याची आपल्या कुटुंबाकडून… अशा कुटुंबासाठी पुरुष स्वतःचा जीवही द्यायला मागेपुढे पाहणार नाही.

तुम्ही सगळ्यांना आवडता

तुम्ही सगळ्यांना आवडता, असं बोलण्यामागे त्या व्यक्तीचं प्रेम दिसतं, तसेच ती व्यक्ती किती प्रसिद्ध आहे  हे देखील समजतं. पुरुषांना अशी स्तुती आवडते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि काम करण्याची ताकदही दुपटीने वाढते.  

तुम्ही अतिशय आधूनिक आहात

गॅजेट्‌समध्ये मास्टरी ही आजच्या जमान्यातील एक जास्तीची हुशारी आहे. कॉम्प्युटर, कॅमेरा, तसेच मोबाईलच्या बाबत पुरुषांना अनेक कमेंट्‌स मिळतात. त्यामुळे आपण स्मार्ट आणि फिट असल्याचं त्यांना जाणवतं आणि त्यांची कार्यक्षमता अधिक वाढते

तुम्ही विश्वासपात्र आहात

आपल्यावर लोकांचा विश्वास आहे, ही गोष्ट काही पुरुषांना खुप अभिमानास्पद वाटते. मग विषय कोणताही असो अगदी काम करण्यापासून ते नाती जपण्यापर्यंत हे पुरुष विश्वासनेच ते करतात.

तुम्ही अतिशय शांत आहात

शांत असणे ही आजच्या जमान्यातील अतिशय दुर्मिळ अशी कॉम्प्लीमेंट आहे. यावरून तुमचा स्मार्टनेस आणि धैर्य दिसून येतं. घरी, कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणीही जर तुम्हाला कोणी शांत म्हणत असेल तर नक्कीच तुमच्यात काही खास आहे. पत्नी आपल्या पतीची जर एकांतात प्रशंसा करत असेल तर त्यांना ते आवडतंच आणि जर पत्नीने सगळ्यांच्या समोर आपल्या पतीची प्रशंसा केली तर त्यांना खूप आवडतं.

प्रशंसा ही कोणालाही, कधीही आवडतेच; हां, पण ती दिलखुलासपणे केली पाहिजे. महिलांनी केलेली प्रशंसा पुरुषांना अधिक आवडते आणि बराच काळपर्यंत आठवणीत राहते. आपली हुशारी, काम, त्यासाठी केलेले प्रयत्न यांचं कौतुक झालं की पुरुषांना स्फुर्ती मिळते. वरून दिसायला कितीही कठोर आणि रफ वाटणारे पुरुषही स्वतःच्या प्रशंसेने जादु केल्याप्रमाणे आनंदी होतात. मग मोकळया मनाने त्यांची प्रशंसा करण्यास काय हरकत आहे?

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli