दीपिका पदुकोण आई होणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये तिला बाळ होणार आहे आणि त्यासाठी ती आणि रणवीर सिंग दोघेही खूप उत्सुक आहेत. आनंदी आहेत. अभिनेत्री कार्यरत असून तिचे काही फोटो समोर आले आहेत, जे रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या सेटवरील आहेत. येथे ती बेबी बंपसोबत दिसत आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दीपिका पदुकोण ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये तिचा एक लुक समोर आला होता. ज्यात ती पोलिसांच्या गणवेशात रक्त बंबाळ दिसली होती. त्याचवेळी, आता ती पुन्हा एकदा पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. रोहित शेट्टीही तिथे उपस्थित आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दीपिका पदुकोणचा बेबी बंप दिसत आहे. अशा फिट कपड्यांमध्ये अभिनेत्री दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकांचे लक्ष फक्त पोटाकडे आहे. जे किंचित वाढलेले आहे. या चित्रपटाच्या ॲक्शन सीनच्या शूटिंगसाठी ती सेटवर पोहोचली होती.
या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या पात्राचे नाव आहे शक्ती शेट्टी.तिच्या डोळ्यावर काळा चष्मा आणि अंगावर खाकी वर्दी आहे. आजूबाजूला दिग्दर्शक आणि क्रू मेंबर आहेत. यामध्ये ती टीम मेंबर्स आणि रोहित शेट्टी यांच्याकडून सूचना घेत आहे. त्याच वेळी, सेटवर एक महिला देखील आहे, जी स्टंट डबलसारखी दिसते. अभिनेत्रीच्या जागी ती काही सीन्स करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेणेकरून तिला त्रास होणार नाही.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…