Marathi

फेक प्रग्नंसी म्हणणाऱ्यांचे दीपिकाने केलं तोंड बंद, हाय हिल्समुळे अभिनेत्री ट्रोल ( Deepika Padukone Troll For Using High Heels In Pregnancy )

दीपिका पदुकोनने तिच्या बेबी बंपवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना अखेर गप्प केले आहे. दीपिका पती रणवीर सिंगसोबत तिच्या पहिल्या बाळाची वाट पाहत आहे. तिने बुधवारी संध्याकाळी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. फोटोत दीपिकाचा चेहरा दिसत नाही पण ती काळ्या रंगाच्या बॉडी-हगिंग आउटफिटमध्ये पोज देताना दिसली. तिचा बेबी बंपही स्पष्ट दिसत होता. काल संध्याकाळी, ती ‘कल्की 2898 एडी’ च्या कार्यक्रमात दिसली, जिथे तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत होता. दीपिका हाय हिल्स घालून आली होती, ज्यासाठी तिची इंटरनेटवर ट्रोल केले जात आहे.

काही आठवड्यांपूर्वी, दीपिका पदुकोण मतदानासाठी बाहेर गेल्यावर ट्रोल झाली होती आणि नेटकऱ्यांनी तिच्या बेबी बंपला ‘फेक’ म्हटले होते.

जेव्हा दीपिका 19 जून रोजी हाय हिल्ससह काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून कार्यक्रमात पोहोचली तेव्हा तिच्या या कृतीचा लोकांना राग आला. दीपिका ६ महिन्यांची गरोदर आहे आणि एवढ्या उंच हिल्स घातल्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. एका यूजरने लिहिले – गरोदरपणात अशा हाय हिल्स धोकादायक असतात. एकाने सांगितले- तुला कितीही सुंदर दिसायचे असले तरी यावेळी हाय हिल्स घालू नको. एकाने लिहिले – गरोदरपणात एवढी उंच हिल कोण घालते? जवळजवळ प्रत्येकाने तिच्या हिल्सकडे बोट दाखवले आहे.
कार्यक्रमादरम्यान, दीपिकाने तिच्या वाढत्या बेबी बंपबद्दल सांगितले. प्रभासबद्दल आणि सेटवरील संपूर्ण स्टाफला तो कसा खायला घालायचा याबद्दल बोलले. दीपिका म्हणाली, ‘त्याने मला खाऊ घातलेल्या अन्नामुळे मी अशी आहे. दररोज, एका वेळी, असे वाटले की जणू काही त्याच्या घरातूनच अन्न येत नाही, तर ते सेवा केंद्रातून येत आहे. प्रभास सगळ्यांना काय खायला घालतोय? जे त्याला ओळखतात त्यांना माहीत आहे की तो मनापासून जेऊ घालतो.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

व्यंग्य- आप कुछ समझते क्यों नहीं? (Satire- Aap Kuch Samjhte Kyon Nahi?)

बॉस थक जाते हैं, कहते है, “यार ये कुछ समझाता क्यों नहीं."और मुझे लगता है,…

July 22, 2024

श्रावण मास पर विशेष: कहानी- हम में शक्ति हम में शिव… (Short Story- Hum Mein Shakti Hum Mein Shiv…)

तभी मां जो शिव की अनन्य भक्त थीं, बोलीं, ''बेटा! जहां ईश्वर हों, वहां आस्था…

July 22, 2024
© Merisaheli