Marathi

दीपिका कक्कडच्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा, शोएब इब्राहिमने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती (Dipika Kakar’s husband Shoaib Ibrahim shares health update of newborn son)

21 जून रोजी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी बाळाचे आगमन झाले. पण या दाम्पत्याचे बाळ प्रीम्यॅच्युर होते, त्यामुळे बाळाला काही दिवस एनआयसीयूमध्ये ठेवावे लागले.

अभिनेता शोएब इब्राहिमने अलीकडेच त्याच्या मुलाच्या तब्येतीची माहिती शेअर केली आहे. काल रात्री त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, अभिनेत्याने आपल्या मुलाच्या प्रकृतीची स्थिती सांगितली की त्याच्या प्रीम्यॅच्युर मुलाला नवजात अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे आणि काही दिवसांनंतर हे जोडपे आपल्या मुलाला सुरक्षितपणे घरी घेऊन जाऊ शकतील.

इन्स्टा स्टोरी शेअर करताना शोएबने लिहिले- अलहमदुलिल्लाह, आज आमच्या मुलाला एनआयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. आता आणखी काही दिवस निरीक्षणासाठी रुग्णालयात राहावे लागणार आहे. इंशाअल्लाह लवकरच आम्ही सर्व घरी असू.

अभिनेत्याने असेही सांगितले – आमचे बाळ खूप लवकर बरे होत आहे, त्याची प्रकृती चांगली आहे. हे सांगताना अभिनेत्याने रेड हार्ट इमोजी देखील बनवला आहे. इतक्या आशीर्वादांबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. अशाच प्रकारे, भविष्यातही त्याला तुमच्या प्रार्थनेत सामील करत राहा.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli