Marathi

‘मेनोपॉजला घाबरू नका’ – अभिनेत्री लारा दत्ताचा महिलांना सल्ला : केली सहभागात्मक संवादाची सुरुवात (“Don’t Be Scared”- Actress Lara Dutta’s Advice To Women In Empowering Menopause Conversations)

“आमच्या घराण्यात महिलांचं साम्राज्य आहे. माझ्या सर्व बहिणींना कन्यारत्ने झाली आहेत. त्यामुळे मासिक पाळी अथवा मेनोपॉज या महिलांच्या शरीरधर्माबद्दल आमच्या घरात विनासंकोच चर्चा होते. माझा नवरा महेश भूपती हा खेळाडू आहे. त्याने देखील सगळ्यांना या नाजुक विषयावर नॉर्मली मुलींना बोलण्यास शिकवलं. तेव्हा मेनोपॉज ही फार मोठी समस्या समजू नका. त्या अवस्थेला घाबरु नका. स्वतःची काळजी घेत सामोरे जा”, असा सल्ला अभिनेत्री लारा दत्ता हिने ‘ॲबॉट’ ने आयोजित केलेल्या मेनोपॉजबाबत सहभागात्मक संवादात दिला. या संवादात प्रसिद्ध सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नोझेर शेरियार आणि सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुचित्रा पंडित यांनी आपली मते मांडली. तसेच ॲबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभाग प्रमुख डॉ. रोहिता शेट्टी यांनी महिलांच्या मेनोपॉजच्या अनुभवांबाबत, लोकांमध्ये जागरुकतेची स्थिती व सामाजिक सहाय्याची आवश्यकता या विषयांवरील चर्चा पुढे नेली.

आपल्या देशातील महिलांची रजोनिवृत्ती (मेनोपॉज) सर्वसाधारणपणे वयाच्या ४६ व्या वर्षी येते. हा वयोगट पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत किमान ५ वर्षे आधी आहे. मात्र या मेनोपॉजचा महिलांचे कुटुंब, दैनंदिन कामे, नातेसंबंध यावर परिणाम होतो.

या काळात त्यांना नैराश्य येते. चिंता ग्रासते. एकाग्रता – झोप कमी होते. चिडचिड होते. तसेच स्मरणशक्ती क्षीण होते. तेव्हा या अवस्थेला घाबरून न जाता डॉक्टरी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तसेच या संदर्भातील सर्व माहितीने त्यांना सुसज्ज केल्यास आधार मिळेल. मेनोपॉजची लक्षणे दिसताच बचावात्मक उपचार करून घ्यावेत, असा या सर्व संवादकांचा, चर्चेत सूर होता.

लारा-दत्ताच्या हस्ते ‘रियल, मेडअप ऑर माईन’ या किटचे अनावरण करण्यात आले. यामध्ये दोन प्रकारच्या कार्डांचा वापर करून महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिले कार्ड परिस्थिती दर्शविणारे असून ते सत्यकथांवर आधारित आहे. तर दुसरे स्टोरी कार्ड हे मेनोपॉज व एकूणच आरोग्याबाबत संवाद सुरू करणारे आहेत. थोडक्यात, ही कार्डस्‌ दाखवून माहिती सांगितल्यावर वक्ते व सहभागी सदस्य मेनोपॉज व त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो याबाबत माहिती देतात.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी: विवाह- एक यज्ञ (Short Story- Vivah Ek Yagy)

उषा वधवा “रिश्ते इतनी आसानी से नहीं तोड़े जाते. विवाह तो वैसे भी दो अलग-अलग…

June 22, 2025

कहानी- सजना है तुम्हें अपने लिए (Short Story- Sajna Hai Tumhe Apne Liye)

पूर्ति खरे “हंस क्या रही हो. सच ही तो कह रही हूं. बचपन में मां…

June 21, 2025
© Merisaheli