Parenting Marathi

बाई लग्न करते तेव्हाच सेटल होते असे लोकांना का वाटते? (Ekta Kapoor Tv Entertainment Celebrity Angry Question On Marriage)

भारतातील टेलिव्हिजन आणि चित्रपट मनोरंजन विश्वातील मोठी सेलिब्रेटी म्हणून जिचं वर्चस्व आहे, अशी एकता कपूर ही नेहमीच तिच्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. ती आपल्या परखड भूमिकांसाठी ओळखली जाते. आपल्या बालाजी टेलिफिल्मसच्या माध्यमातून एकताने मनोरंजन विश्वात आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. सध्या तिला पापाराजींनी लग्नावरुन प्रश्न विचारल्यामुळे तिचा संताप झाल्याचे दिसून आले आहे.

पापाराजींनी लग्नावरुन विचारलेल्या प्रश्नावरुन एकता कपूरला खूपच राग आला आहे. दरवेळी नको त्या प्रश्नावरुन का लक्ष्य करत असता, या प्रश्नांनी तुम्हाला काय साध्य करायचे असते, अशा प्रकारे तिनं आपला राग व्यक्त केला आहे. क्योंकी की सास भी कभी बहू थी, बडे अच्छे लगते है, कुमकुम भाग्य सारख्या लोकप्रिय मालिकांची निर्माती म्हणून एकताचे नाव घेतले जाते.

याशिवाय बॉलीवूडमधील कित्येक बड्या चित्रपटांची निर्मिती एकतानं केली आहे. सध्याच्या घडीला हिंदी चित्रपट विश्वातील सर्वात मोठी निर्माती म्हणून ती ओळखली जाते. एकता ही तिच्या आगामी थँक यू फॉर कमिंग नावाच्या चित्रपटावरुन चर्चेत आली आहे. त्यावेळी तिला तिच्या लग्नावरुन प्रश्न विचारण्यात आला होता.

मला नेहमीच लग्नावरुन प्रश्न विचारण्यात येतो. मॅडम तुम्ही केव्हा सेटल होणार असे विचारले जाते. तो प्रश्न ऐकल्यावर मला एवढा राग येतो की, काय बोलावे हेच कळत नाही. लोकांना कसं सांगू की मी सेटल झाली आहे. मला अजून किती सेटल व्हावे लागणार आहे हेच कळत नाही. बाई लग्न करते तेव्हाच सेटल होते असे लोकांना का वाटते? लग्न करणं खरच गरजेचं आहे का?

मुली काय लग्नाशिवाय जगू शकत नाही का, अनेकांना असे का वाटते की, मुलींनी लग्न करायलाच हवे. आयुष्य सेट होण्यासाठी लग्नचं करायला हवे असे काही नाही. हेच प्रश्न तुम्ही मुलांनाही विचारु शकता, सलमान भाईला देखील असे प्रश्न विचारले जातात की, लग्न कधी करणार म्हणून? असो.

थँक यु फॉर कमिंग विषयी बोलायचे झाल्यास त्यात भूमि पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंह, कुशा कपिला, शिबानी बेदी, प्रद्युम्न सिंह मॉल, नताशा रस्तोगी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025
© Merisaheli