Marathi

संगीतकार प्रशांत नाकतीच्या लग्नात चित्रीत झाली ५ गाणी : खऱ्या लग्नात चित्रीत झालेला ‘लगीन सराई’ अलबम (Five Wedding Songs Picturised In Music composer Prashant Nakti’s Wedding Ceremony : First Ever Musical Album Shot In Real Life Marriage)

सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कित्येक प्रीवेडींग फोटोशूट करताना जोडपी बघतो. पण सुपरहिट संगीतकार प्रशांत नाकतीने स्वतःच्या लग्नात एक नाही तर तब्बल ५ गाणी बनवली आहेत. त्याच्या लग्नाचं ५ गाण्यांनी सजलेलं ‘लगीन सराई’ हे मराठी गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी आणि हिंदी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीतील असं हे पहिलंच गाणं आहे. ज्याचं चित्रीकरण खऱ्याखुऱ्या लग्नात पार पडलं. लगीन सराई या गाण्यात मेहंदी हाताला, हळदी अंगाला, दादूस सोय कर आपली, मंगलाष्टके आणि भावड्या अश्या ५ गाण्यांमध्ये प्रशांत नाकती आणि प्रिया नाकती यांच्या लग्नातील अविस्मरणीय क्षणांचा अनुभव आपल्याला घरबसल्या घेता येईल. सध्या सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

या गाण्याविषयी प्रशांत नाकती सांगतो, माझं लग्न फार घाईघाईत ठरलं त्यामुळे प्रीवेडींग फोटोशूटसाठी माझ्याकडे वेळ नव्हता. म्हणून मी आणि माझ्या टीमने लग्नासाठी नवं गाणं करण्याचं ठरवलं. लग्नाच्या ५ दिवस अगोदर मी प्रथेनुसार कुठेही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी आणि संकेतने घरातल्या सेटअपवर गाणी कम्पोज केली. माझ्या जवळचे काही कलाकार मित्र आहेत. ते म्हणाले आम्हालाही लग्नाच्या गाण्यात दिसायचंय. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ही ५ वेगवेगळी गाणी करण्याचं ठरवलं.”

पुढे तो ५ गाण्यांविषयी सांगतो, “‘मेहंदी हाताला’ आणि ‘हळदी अंगाला’ ही दोन गाणी गायिका ‘सोनाली सोनावणे’ हिने गायली आहेत तर ‘दादूस सोय कर आपली’ हे गाणं गायक ‘परमेश माळी’ याने गायलं आहे. मंगलाष्टके आणि भावड्या ही दोन्ही गाणी रवींद्र खोमणे याने गायली आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी जयेश पाटील याने केली आहे. तर लग्नातील काही सीन्स प्रशांच्या राहत्या घरात चित्रीत झाले आहे. नीक शिंदे, रितेश कांबळे, तृप्ती राणे, सोनाली सोनावणे, असे २०० हून अधिक कलाकार प्रशांत आणि प्रिया नाकतीच्या लग्नाला उपस्थित होते.”

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli