Health Update Marathi

‘चांगला कॅन्सर’ असू शकतो का? ‘सीएमएल’ या ब्लड कॅन्सर प्रकाराचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे (‘Good Cancer’ Is A Type of Leukaemia Which is On The Rise In India: Comprehensive Guide To Its Management Known As CML)

क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (CML) हे केवळ एक निदान नसून तो एक आयुष्यभर चालणारा प्रवास आहे, ज्यात सक्रीय व्यवस्थापन आणि भावनिक चिकाटी गरजेची आहे. ल्युकेमियाच्या एकूण प्रकरणांपैकी केवळ १५ टक्‍के प्रमाण असलेल्या CML आजारामध्ये बोन मॅरोवर परिणाम होतो ज्यातून पांढऱ्या पेशींची अनिर्बंध वाढ होऊ लागते. कर्करोगाचे निदान हे सुरुवातीला घाबरवून टाकणारे असले तरीही योग्य पद्धत वापरल्यास CML चे व्यवस्थापन शक्य आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे.

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील हिमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट विभागाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. समीर तुळपुळे म्हणाले, “माझ्या पाहण्यात असे अनेक रुग्ण आले आहेत, जे CMLमुळे तीव्र भावनिक उद्वेगातून जात असतात. मात्र जिथे हा आजार नियंत्रणात आणणे अधिक शक्य असते अशा क्रॉनिक टप्प्याचे निदान झालेल्या रुग्णांना आव्हाने असूनही एक परिपूर्ण आयुष्य जगता येऊ शकते. CMLचे व्यवस्थापन करताना त्यात सक्रीयतेने सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण क्रॉनिक टप्प्यातील CML वर वेळीच उपचार न झाल्यास तो वेगाने बळावू शकतो.

आपल्या उपचारांच्या परिणामकारकतेची खातरजमा करण्यासाठी आणि आजार अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचण्यास प्रतिबंध करण्यासाठी तुमच्या BCR-ABL पातळ्यांवर नियमितपणे देखरेख ठेवणे आणि उपचारांच्या इप्सित लक्ष्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. रुग्णांना क्रॉनिक आजाराबरोबर जगताना सामोऱ्या येणाऱ्या भावनिक आणि मानसिक आव्हानांना हाताळता यावे यासाठी त्यांची मदत करताना समुपदेशनही महत्त्वाची भूमिका बजावते. याखेरीज आपल्या डॉक्टरांशी नवीनतम उपचारपद्धतींविषयी चर्चा केल्यास तुम्हाला आपल्यावरील उपचारांची दिशा समजून घेण्यास मदत होईल आणि अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य जगता येईल.”

बहुतेकदा CML ला ‘गुड कॅन्सर’ – चांगला कॅन्सर म्हटले जाते कारण तो हाताळता येण्याजोगा आहे, तरीही CML अधिकाधिक गंभीर होत गेला की मात्र तो चांगला रहात नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही रुग्ण औषधांना प्रतिसाद देईनासे होतात किंवा त्यांना असे काही दुष्परिणाम दिसून येतात, ज्यांचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ लागतो. असे असले तरीही, वेळीच केलेला हस्तक्षेप आणि काळजीपूर्वक ठेवलेली देखरेख यामुळे ही आव्हाने टाळण्यास किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते.

CML सोबतच्या तुमच्या वाटचालीला आधार देणाऱ्या काही सूचना ज्या तुम्हाला स्वत:हून अंमलात आणता येतील:

•          सातत्यपूर्ण देखरेख: उपचारांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी आणि काही बदल झाल्यास ते लगेच ओळखण्यासाठी तुमच्या BCR-ABL पातळीचा सातत्याने मागोवा घ्या. वेळच्यावेळी हस्तक्षेपासाठी आणि आजार बळावण्यास प्रतिबंध करण्यासाठी नियमित देखरेख अत्यंत महत्त्वाची आहे.

•          सर्वांगीण दृष्टिकोन: मानसिक स्वास्थ्यासाठी आधार, आहारातील तडजोडी आणि नियमित व्यायाम या गोष्टींचा तुमच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये समावेश करत उपचारांमध्ये एक सर्वांगीण दृष्टिकोन जपा. या सर्वांगीण दृष्टिकोनामुळे तुमच्या एकूण स्वास्थ्याला बळकटी मिळेल आणि CML व्यवस्थापनालाही आधार मिळेल. 

•          मनमोकळा संवाद : आपले डॉक्टर आणि काळजीवाहू व्यक्ती यांच्याशी आपणहून खुला आणि प्रामाणिक संवाद साधा. कोणत्याही प्रकारच्या चिंता, लक्षणे किंवा CML सोबतच्या वाटचालीत तुम्हाला सामोरी येणारी कोणतीही आव्हाने याविषयी बोलते व्हा, जेणेकरून तुम्हाला परिणामकारक मदत आणि व्यवस्थापनाची हमी मिळेल.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

पहला अफेयर- बूंदों की सरगम… (Love Story- Boondon Ki Sargam)

हल्की सी बूंदाबांदी शुरू हो गई. वह बूंदों की सरगम पर फिर गुनगुनाने लगी. उसका…

September 11, 2024

 एक्स सूनेच्या सांत्वनाला पोहचले खान कुटुंब, मलायकाच्या वडीलांच्या आत्महत्येनंतर अरबाजही लगेच पोहचला (Khan Family Reaches Malaika’s Parent’s House To Support Malaika In Tough Times)

मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी त्यांच्या फ्लॅटच्या…

September 11, 2024

कहानी- आसमान का पंछी (Short Story- Aasman Ka Panchi)

उस पेड़ पर कुछ पंछी उछल-कूद रहे थे. कभी वो इस डाली पर बैठते, तो…

September 11, 2024
© Merisaheli