टीव्ही मालिकांमुळे केवळ मनोरंजन होतं असं नाही तर चाहत्यांची स्वप्न देखिल पूर्ण होऊ शकतात. कोल्हापूरच्या वंदना लोहार या स्टार प्रवाहच्या चाहतीने नुकताच याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. स्टार प्रवाहच्या ‘उदे गं अंबे’ मालिकेसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद देण्यात आला. जवळपास दीड लाख प्रेक्षक या स्पर्धेत सहभागी झाले.
कोल्हापूरच्या रोहिणी यांनी देखिल या स्पर्धेत भाग घेतला आणि अचूक उत्तर देऊन साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याचा मान पटकावला. उदे गं अंबे मालिकेतील भगवान शिवशंकर म्हणजेच अभिनेता देवदत्त नागे आणि आदिशक्ती म्हणजेच मयुरी कापडणे यांच्या हस्ते रोहिणी यांना ही सुवर्णमुद्रा सुपूर्द करण्यात आली.
स्टार प्रवाहकडून मिळालेली ही अनमोल भेट मी कायम जपून ठेवेन. उदे गं अंबे मालिकेतील भगवान शिवशंकर आणि आदिशक्ती यांनी कोल्हापुरात आमच्या घरी येऊन ही खास भेटवस्तू दिली याचा आनंद गगनात मावत नाहीय. मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांची गोष्ट आम्हा प्रेक्षकांना अनुभवयला मिळत आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…