सुरक्षित संबंध कसे ठेवाल?
आजकालचे आपले जीवन असुरक्षित दिसून येते. सामाजिक जीवन आणि आरोग्य देखील असुरक्षित वाटते. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. अन् आपल्या हाती ती राहिली नाहीत. तेव्हा आपली सुरक्षा आपणच करणे अगत्याचे आहे. आपले लैगिंक स्वास्थ्य सुरक्षित राखणे हे आपल्याच हाती आहे. लैंगिक संबंध हा विषय नाजुक आहे. तद्वतच ते सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
लैंगिक संबंधातून गर्भ राहणार नाही किंवा राहिल्यास त्याचं नि आपलं आरोग्य सुरक्षित राहावं, ही काळाची गरज आहे. अलिकडे विवाहित जोडप्यांना लवकर मूल नको असतं. किंवा एकानंतर दुसरं लगेच नको असतं. त्यातूनच सुरक्षित लैंगिक संबंधाची गरज निर्माण झालेली आहे.
गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या (ज्या महिनाभर घ्यायच्या असतात) हा सुलभ मार्ग आहे. त्याचबरोबर मंथली इंजेक्शन व इतर आधुनिक उपकरणांनी गर्भधारणा टाळता येते. (यू केअर, व्हजायनल रिंग इत्यादी)
दररोज घेण्याची गर्भनिरोधक गोळी एखाद दिवशी चुकली तर दुसर्या दिवशी दोन गोळ्या घ्याव्यात. नंतर मात्र न चुकता दररोज घ्यावी. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव्ह म्हणून देखील एक गोळी मिळते. शारीरिक संबंध घडले नि गोळी घेतली नसली तर ही गोळी कामी येऊ शकते.
गोळ्यांव्यतिरिक्त कंडोमचा वापर हा सर्वसामान्य उपाय आहे. कंडोम गर्भ प्रतिबंधक आहे. शिवाय नाजुक अवयवांचे इन्फेक्शन पासून संरक्षण करते.
लुब्रिकेटेड कंडोम वापरणे अधिक श्रेयस्कर ठरते. जुने किंवा एक्सपायरी डेट झालेले कंडोम वापरू नयेत. ते फाटू शकतात. अलिकडे पुरुषांच्या कंडोम सारखेच स्त्रियांचे कंडोम देखील उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर करायला हरकत नाही.
पुरुष आणि स्त्रियांचे कंडोम एकाच वेळी वापरू नयेत. मात्र या सर्व उत्पादनांचा वापर करताना, त्याच्या पाकिटावरील सूचनांचे पालन करा.
शरीरसंबंध राखताना आपण निरोगी असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या लैंगिक अवयवांची साफसफाई ठेवणे, निगा राखणे गरजेचे आहे. या विषयावर आपल्या जोडीदाराशी चर्चा करण्यात संकोच बाळगू नका. एकमेकांच्या चर्चेतून आपले आरोग्य अधिक चांगले राखले जाईल.
वातावरणातील बदल किंवा शारीरिक बिघाड झाल्यास स्त्री-पुरुषांच्या अवयवांना संसर्ग होऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष न करता, विनासंकोच डॉक्टरांना दाखवावे. त्यांच्या सल्ल्यानुसारच उपाययोजना करावी.
kinky and raw sex may be good to ignite the carnal fire between two individuals,…
ऑस्कर अवॉर्ड विजेता संगीतकार एआर रहमान (AR Rahman) की पर्सनल लाइफ से एक शॉकिंग न्यूज…
ये धड़कनें भी अजीब हैंकभी-कभी बेवजह धड़कती हैंसांस लेने के लिएदिल पूछता हैजब तुम नहीं…
राजेश मां की बातें सुन कर आश्चर्य एवं आक्रोश से कह उठा, "मां, कई वर्षो…
स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अपनी फिल्मों को लेकर कम और विवादों को लेकर ज्यादा सुर्खियों…
अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं.…