FILM Marathi

केवळ ५ आठवड्याच हृतिकने स्वत:ला किती बदलेले पाहा, त्याची प्रेरणा ठरली ही व्यक्ती (Hrithik Roshan Shares His Five-Week Epic Body Transformation, Fans Stunned)

ग्रीक गॉड म्हटला जाणारा अभिनेता हृतिक रोशन याने सोशल मीडियावर त्याचा नवे फोटो शेअर केले आहे. अभिनेत्याची ही छायाचित्रे त्याच्या जबरदस्त शारीरिक परिवर्तनाची आहेत. त्याच्या जबरदस्त शारीरिक परिवर्तनाचे नवीन फोटो पोस्ट करताना, अभिनेत्याने त्याची प्रेरणा देखील शेअर केली. अभिनेत्याने याचे श्रेय त्याची जोडीदार आणि गर्लफ्रेंड सबा आझादला दिले आहे.

अभिनेता हृतिक रोशन, सध्या त्याच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. नुकताच  त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या मोठ्या शारीरिक परिवर्तनाची छायाचित्रे शेअर केली आहेत. आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी त्याच्या शरीराला आकार देण्यासाठी अभिनेत्याने हे मोठे शारीरिक परिवर्तन केले आहे. ख्रिस गेथिनच्या देखरेखीखाली हृतिकने हे ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.

परिवर्तनाचे नवीन फोटो शेअर करताना, अभिनेत्याने त्याच्या ऑगस्ट आणि ऑक्टोबरच्या फोटोंची तुलना केली आहे. अभिनेत्याने त्याच्या परिवर्तनामागील त्याची प्रेरणा आणि कठोर परिश्रम स्पष्ट करणारी एक लांब नोट देखील लिहिली. या नोटमध्ये हृतिकने लिहिले आहे- 5 आठवडे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सुट्टीपासून पोस्ट-शुटिंगपर्यंत. काम फत्ते झाले. गुडघे, पाठ, घोटे, खांदे आणि मणक्याचे आभार. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. आता आराम करण्याची, बरे करण्याची आणि चांगले संतुलन शोधण्याची वेळ आली आहे.

त्याच्या परिवर्तनाच्या प्रवासातील सर्वात कठीण भागाचे वर्णन करताना, हृतिकने लिहिले – सर्वात कठीण भाग म्हणजे – महत्वाच्या गोष्टींना नाही म्हणणे त्यात तुमचे प्रियजन, मित्र, सामाजिक प्रसंग, शाळेचे PTM आणि अगदी कामाचे तासही येतात. दुसरा सर्वात कठीण भाग – रात्री 9 वाजता झोपणे.

अभिनेत्याच्या परिवर्तनाची ही छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझाद हिने अभिनेत्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले – आणि हे घडले… विक्रमी वेळेत आपले ध्येय गाठणे 🙂 अभिनेत्याचे चाहते त्याच्या फोटोला खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli