Marathi

बेरोजगार म्हणून जगणाऱ्या तरुणाची ‘जिव्हारी’ लागणारी गोष्ट मराठी ओटीटीवर! (‘Jivhari’ movie on Marathi OTT!)

देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पाहण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात अलौकिक मांडली गेली आहे. आज २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे.

परदेशात जाऊन नोकरी करणारा महाराष्ट्रातला एक तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परततो. आपल्या गावी परत आल्यानंतर पुन्हा परदेशाची वाट न धरता इथेच आपल्या उपजीविकेचं साधन शोधण्याचा निर्णय घेतो. जवळजवळ चौदा नोकऱ्या बदलून आई वडिलांवर भार झालेला हा तरुण आयुष्यात पुढे अशी एक गोष्ट करतो, जे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं आहे. ती आश्चर्याची गोष्ट काय असेल हे प्रमुख कलावंत निकिता सुरेश कांबळे, सुयोग सुदर्शन भोरे, ओंकारसिंग उदयसिंग राजपूत, नील राजुरीकर, मनीषा दामोदर मोरे या नवोदित कलाकारांच्या टवटवीत अभिनयाने कळणार आहे. चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन गणेश शंकर चव्हाण यांनी केले आहे. 

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कडक ऊन आणि थंडगार पन्हं (Harsh Heat And Cold Panha)

उन्हाचा दाह वाढू लागला की, काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते. अशा वेळी उन्हाळ्यातील दाह कमी…

May 28, 2024

रुग्णालयात राखीवर हल्ला, डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला गुप्त जागी शिफ्ट केले (Rakhi Sawant Ex Husband Claims She Was Attacked In The Hospital)

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच तिची तब्येत अचानक बिघडली…

May 28, 2024

कविता- सफलता सांझी है (Poem- Saflata Sanjhi Hai)

मत भूल सफलता सांझी हैकुछ तेरी है, कुछ मेरी हैमां-बाप और बच्चे सांझे हैंकुछ रिश्ते-नाते…

May 27, 2024

कहानी- नानी का घर (Short Story- Nani Ka Ghar)

हमारा कल्पनाओं की उड़ानवाला बचपन उसकी बात सच मानकर आईने के पीछे की दुनिया खोजने…

May 27, 2024
© Merisaheli