Marathi

ज्युनियर महमूद यांची कॅन्सरशी झुंज अपयशी, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ही इच्छा केलेली व्यक्त (Junior Mahmood Has Passed Away Due To Cancer, This Is His Last Wish)

70-80 च्या दशकात आपल्या अभिनय आणि विनोदाने लाखो चेहऱ्यांवर हास्य आणणारे ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले आहे. ज्युनियर महमूद काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते, त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी आले. रुग्णालयातून घरी परतत असताना अभिनेता एका वृत्तवाहिनीशी बोलले होते. जिथे अभिनेत्याने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती.

ज्युनियर महमूदची शेवटची इच्छा काय आहे?

ज्युनियर मेहमूद चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेते कारमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यादरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना ज्युनियर महमूदने आपली शेवटची इच्छा सांगितली. देवाकडून त्यांचे काय मागणे आहे, या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेता म्हणाले – ‘मी एक साधा माणूस आहे, तुम्हाला हे माहित असेलच… मी मेलो तर तो माणूस चांगला होता असं जगाने म्हणावं बस…. असे चार जणांनी जरी म्हटले तरी तो माझा विजय झाला असेल.

अखेरच्या क्षणी अनेक कलाकार भेटायला आले

ज्युनियर मेहमूद जेव्हा हॉस्पिटलमधून घरी शिफ्ट झाले तेव्हा अनेक कलाकार त्यांना भेटायला आलेले. जॉनी लिव्हर, जितेंद्र आणि मास्टर राजू, सचिन पिळगांवकर जाऊन ज्युनियर महमूदला भेटले होते. त्यांची अवस्था बघून जितेंद्र आणि मास्तर राजूचेही डोळे ओले झाले. ज्युनियर महमूदने आपल्या करिअरमध्ये 2६५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्युनियर मेहमूदने फक्त हिंदीच नाही तर जवळपास 7 भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्युनियर मेहमूदचे नाव परवरिश, मेरा नाम जोकर, दो और दो पांच यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

अनुपम खेर- भीगा हुआ आदमी बारिश से नहीं डरता… (Anupam Kher- Bhiga huwa aadmi barish se nahi darta…)

- आप 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में रिश्ते और इमोशन के मकड़जाल को देखेंगे. इसमें…

July 7, 2025

कहीं आप ख़ुद को चीट तो नहीं कर रहीं? करें रियलिटी चेक (Are you cheating yourself? Do a reality check)

कई बार हम अपनी ज़िंदगी में इतने उलझ जाते हैं कि वास्तविकता को देखने की…

July 7, 2025

कहानी- बचपन जैसी बारिश (Short Story- Bachpan Jaisi Barish)

''वाह आशा! कितना मज़ा आ रहा‌ है बारिश में, सच्ची तुमने तो बचपन की याद…

July 7, 2025
© Merisaheli