Marathi

अजय देवगण आणि काजोलची लेक नीसा झाली २१ वर्षांची , अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट  (Kajol Shares Adorable Post Ahead Of Daughter Nysa Birthday)

अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा देवगणचा उद्या २१ वा वाढदिवस आहे. पण नीसाची आई आणि अभिनेत्री काजोलने तिच्या मुलीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी स्वतःचे आणि बाळा नीसाचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नीसा देवगन 21 एप्रिल रोजी 21 वर्षांची होणार आहे.

काजोलने नीसाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी तिच्या इंस्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत, त्यासोबत अभिनेत्रीने एक लांबलचक नोट देखील लिहिली आहे. या फोटोंमध्ये नीसा तिची आई आणि अभिनेत्री काजोलच्या मांडीवर बसली आहे आणि ती तिला घट्ट मिठी मारत आहे.

या फोटोंसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. अभिनेत्रीने लिहिले – नीसाचा 21 वा वाढदिवस आहे. पण आज माझा दिवस आहे आणि मी आई कशी झाली. तिने माझी सर्वात मोठी इच्छा कशी पूर्ण केली. ती माझी प्रत्येक इच्छा रोज कशी पूर्ण करते.. ती मला रोज कशी हसवते.

मला कसे वाटले होते जेव्हा ती माझ्या मागे येते आणि प्रत्येक वेळी मम्मी मम्मी म्हणत असते… मला पुन्हा एक दिवस तिला माझ्या पोटात ठेवावेसे वाटते. जेणेकरून मी गर्भधारणेदरम्यानचा तसाच तो काळ मला अनुभवता येईल.

तुम्हाला तुमच्या मुलांसाठी काय वाटते हे वर्णन करण्यासाठी प्रेम हा एक सामान्य शब्द आहे. हे पुरेसे आहे. होय, आजचा दिवस माझ्याबद्दल आहे.

काजोलने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

आणि नीसाला वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli