Marathi

कतरिना कैफ आणि विजय सेतूपती यांचा बहूप्रतिक्षित मेरी ख्रिसमसचा ट्रेलर रिलीज, सस्पेन्स आणि थराराने परिपूर्ण आहे सिनेमा (Katrina Kaif and Vijay Sethupathi’s much awaited Merry Christmas trailer release )

कतरिना कैफ आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. आता ख्रिसमसच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या मागील ‘बदलापूर’ आणि ‘अंधाधुन’ या चित्रपटांच्या शैलीची झलक पाहायला मिळते.

‘मेरी ख्रिसमस’च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होताना दिसत आहे. मात्र, जसजशी कथा पुढे सरकते तसतशी फसवणूक आणि धोक्याची झलक दिसू लागते.

2 मिनिटे 20 सेकंदाचा ट्रेलर ख्रिसमसच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ दाखवतो, तो वेळ कॅटरिना आणि विजय एकत्र घालवत आहेत. यानंतर दोघेही एकत्र नाताळ सेलिब्रेट करतात आणि एकत्र खूप मजा करतात. प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन जाणारी अशी दृश्ये चित्रपटात पाहायला मिळत आहेत.

ट्रेलरमध्ये कतरिना आणि विजय सेतुपती यांच्यात रोमँटिक सीन्स पाहायला मिळत आहेत. दोघांची केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये कतरिना एका थिएटरमध्ये एका मुलीसोबत चित्रपट बघताना दिसत आहे. पुढच्याच क्षणात विजय त्या दोघांच्या समोरच्या सीटवर शिरतो आणि मग डोळ्याच्या झटक्यात कतरिना त्या मुलीसोबत गायब होते. या दृश्यामुळे अस्वस्थता खूप वाढली आहे.

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ मध्ये कतरिना आणि विजय व्यतिरिक्त टिनू राज आनंद, संजय कपूर, राधिका आपटे, विनय पाठक, अश्विनी काळसेकर आणि प्रतिमा कानन सारखे स्टार्स देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख यापूर्वी दोनदा बदलण्यात आली आहे. आता अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 12 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli