केशरी मोदक आणी नारळाच्या दुधातले मोदक (kesar Modak And Coconut Modak)

केशरी मोदक

पारीसाठी साहित्य : उकड बनविण्याचे साहित्य. या मोदकांसाठी अर्धा कप दुधात केशराच्या काड्या घालून हे दूध उकड काढताना पाण्यात घालावे.

सारणासाठी साहित्य : दोन कप नारळाचा चव, एक कप साखर, अर्धा कप खवा, दोन टेबलस्पून पिठीसाखर, ड्रायफ्रुट पावडर.

कृती : थोडेसे तूप टाकून नारळाचा चव परतून घ्या. इतर साहित्य टाकून सारण तयार करा. हे तयार केलेले सारण भरून मोदक तयार करा. केशरी पिवळ्या रंगाचे हे मोदक सुंदर दिसतात.

नारळाच्या दुधातले मोदक

या पाककृतीत सारण उकडीच्या मोदकाप्रमाणेच राहील. मात्र उकड काढताना पुढीलप्रमाणे साहित्य घेऊन काढावी.

पारीसाठी साहित्य : एक कप तांदळाचे पीठ, एक कप पाणी, अर्धा कप नारळाचे दूध, एक चमचा साखर, पाव चमचा मीठ, दोन चमचे लोणी, चिमूटभर मीठ.

कृती : एका नारळाचा चव घेऊन त्यात थोडं गरम पाणी घाला. याचे अर्धा कप घट्ट दूध काढा व उकडीसाठी वापरा. नेहमीप्रमाणे उकड काढून मोदक बनवा. पारीमध्ये नारळाचे दूध वापरल्याने हे मोदक मधुर चवीचे होतात.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

क्विक पार्टी आइडिया: मिनी पिज़्ज़ा बाइट (Quick Party Idea: Mini Pizza Bite)

किड्स पार्टी के लिए क्विक स्नैक्स बनाने की प्लानिंग कर रहे हैं, तो आप मिनी…

May 7, 2024

MANGO ECLAIRS

IngredientsFor Choux Paste200 gm butter , 500 ml water, 300 gm flour, 25 gm sugar,…

May 7, 2024

शाही मँगो मलार्ई सँडविच (Shahi Mango Malai Sandwich)

साहित्य : 4 पांढरे ब्रेड स्लाइसेस, एकतारी पाक 2 ते 3 वाट्या, आटवलेले गोड दूध/रबडी…

May 7, 2024

MANGO CHEESE CAKE

This rich cheesecake mixture with chunks of fresh mangoes, baked to perfection on a cookie…

May 6, 2024

डिफरेंट फ्लेवर: क्रिस्पी पालक पूरी (Different Flavour: Crispy Palak Poori)

आपने पालक के परांठे, पकौड़े और सब्ज़ी तो बहुत बार खाई होगी, लेकिन अब की…

May 6, 2024

कारल्याचे लोणचे (Karle Lonche)

साहित्य : 4-5 हिरवीगार कारली, मीठ, 3 टेबलस्पून तेल, हिंग, थोडी हळद, मोहरी, 2 चमचे…

May 6, 2024
© Merisaheli