Marathi

डॉन ३ मुळे कियारा अडवाणीवर पडणार पैशांचा पाऊस, कोट्यवधींच्या घरात आकारतेय फी ( Kiara Advani Fees For Don 3 Movie)

सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणीचे नाव आवर्जून घेतले जाते. तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. येत्या काळात कियारा अनेक बिग बजेट सिनेमामध्ये पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वीच कियारा डॉन ३ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसेल याची घोषणा करण्यात आली तेव्हा पाहून तिच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

कियारा अडवाणी ‘डॉन ३’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी क्रिती सेननची या भूमिकेसाठी निवड केलेली. पण नंतर कियाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. कियारा आणि क्रितीची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती पण रणवीर सिंहला कियाराला चित्रपटात कास्ट करण्याची विनंती केली. त्यानंतर फरहानने कियाराला सिनेमाची ऑफर दिली.


”बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी या सिनेमासाठी भरघोस फी आकारत असल्याचे सूत्रांकडून समोर आले . ‘डॉन ३’साठी कियारा अडवाणीने १३ कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला. ही तिची आतापर्यंतची सर्वात मोठी फी आहे. इतकेच नाही तर ‘वॉर २’साठी मिळणाऱ्या फीपेक्षा ही रक्कम ५० टक्के जास्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

कियारा अडवाणी आणि रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डॉन ३’ २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

इरफान खानच्या लेकाचा दिलदारपणा, गरजू व्यक्तीला ५० हजारांची मदत, पण आपलं नाव न सांगण्याची अट (Irrfan Son Babil Khan Donated 50 Thousand Rupees To Person )

दिवंगत अभिनेता इरफानचा मुलगा बाबिल खान हा एक चांगला मनाचा माणूस आहे. मुंबईपासून १०० किमी…

April 30, 2024

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024
© Merisaheli