Entertainment Marathi

महिला संगीतकारांना प्रोत्साहन देण्याचा अनोखा उपक्रम ‘कोलॅब हर म्युझिक कॅम्प’चे आयोजन (‘Kolab Her Music Camp’ Organised To Motivate Women Music Composers)

प्रत्येक क्षेत्रात महिला आपली क्षमता सिद्ध करत आहेत, नवीन यशाच्या संधी निर्माण करत आहेत. संगीत उद्योगही त्याला अपवाद नाही, मात्र अजूनही महिलांची भागीदारी सुधारण्याची गरज आहे. २०२४ मध्ये, प्रमुख चार्ट्समध्ये महिला गीतकार फक्त १८.९% तर महिला संगीत निर्माते फक्त ५.९% होते, असे बिलबोर्ड हॉट १०० ईयर-एंड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

ही तफावत ओळखून, इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड (आयपीआरएस) आणि सोनी म्युझिक पब्लिशिंग यांनी ‘कोलॅब हर म्युझिक कॅम्प’ २०२५ सुरू केला आहे—एक अनोखा उपक्रम जो महिला संगीत निर्मात्यांना प्रोत्साहन, प्रेरणा आणि संधी प्रदान करतो. हा विशेष कॅम्प महिला दिनानिमित्त मुंबईतील बे आउल स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आला. याचा उद्देश महिला गीतकार, संगीतकार आणि निर्मात्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हा होता.

५ ते ७ मार्च दरम्यान झालेल्या या तीन दिवसांच्या कॅम्पमध्ये विविध महिला संगीतकारांनी सहभाग घेतला. हा कॅम्प हार्मनी, एम्पॉवरमेंट आणि रिव्होल्यूशन (HER) या मूल्यांवर आधारित होता. यामध्ये सह-लेखन सत्र, संगीतरचना आणि नाविन्यपूर्ण सहयोग यांचा समावेश होता.

यासंदर्भात दिनराज शेट्टी, एमडी – सोनी म्युझिक पब्लिशिंग, म्हणाले, “हा कॅम्प म्हणजे महिला दिनाच्या सन्मानार्थ आयोजित केलेला संगीत आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. आम्ही प्रत्येकाला या प्रेरणादायी प्रवासाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करतो.”

राकेश निगम, सीईओ – आयपीआरएस, म्हणाले, “संगीत क्षेत्रात महिलांना पुरेशा संधी मिळत नाहीत. हा उपक्रम सोनी म्युझिक पब्लिशिंगच्या सहकार्याने त्यात बदल घडवण्यासाठी घेतलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

या कॅम्पमध्ये प्रिया सरैया, शाशा तिरुपती, अरुशी कौशल, अनुभा बजाज, शायरा अपूर्वा, बावरी बसंती, छवी सोधानी, नेहा करोड़े, चित्रलेखा सेन यांसारख्या प्रतिभावान महिला कलाकारांनी सहभाग घेतला.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli