Entertainment Marathi

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयात केला जाणार प्रदर्शित (‘Laapataa Ladies’ Movie To Be Screened For Supreme Court Judges, Kiran Rao & Aamir Khan To Attend)

किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची यंदा खूप चर्चा झाली. १ मार्च २०२४ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता. पण या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखवला जाणार आहे.

किरण रावने दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ आज (९ ऑगस्ट रोजी) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रदर्शित केला जाणार आहे. यासंदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे, ज्यामध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगबद्दल माहिती दिली आहे. निर्माता आमिर खानसह स्वतः किरण रावही या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर ते उपस्थितांशी संवादही साधणार आहेत.

एका नोटीसमधील माहितीनुसार, भारताचे सरन्यायाधीश स्क्रिनिंगला उपस्थित राहतील. तसेच इतर न्यायाधीश त्यांच्या जोडीदारासह या सिनेमाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत. हा चित्रपट संध्याकाळी ४.१५ ते ६.२० या वेळेत न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर दाखवला जाईल. त्यानंतर आमिर खान आणि किरण राव यांच्याशी संवाद साधला जाईल. ‘इंडिया टुडे’ने हे वृत्त दिलं आहे.

“सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केला आहे, त्यामुळेच ही स्क्रीनिंग होत आहे. सर्वोच्च न्यायालयात अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्यांचा प्रचार केला जात नाही. जसे की आता आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी २४ तास उपलब्ध असलेले आयुर्वेदिक क्लिनिक आहे. त्यामुळे, हे स्क्रीनिंग सदस्यांमधील परस्पर संबंध मजबूत व्हावे यासाठी आहे,” अशी माहिती सरन्यायाधीशांनी बार अँड बेंचला दिली.

नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे ‘लापता लेडीज’

‘लापता लेडीज’ हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही कथा दोन नवविवाहित तरुणींची आहे, ज्या सासरी जात असताना ट्रेनमध्ये बदलतात. त्यानंतर दोघींच्या आयुष्यात जे काही घडतं ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाने २३.२९ कोटी रुपयांची कमाई केली. तसेच या चित्रपटाचे खूप कौतुकही झाले.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli