लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत.
‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात श्रुती आणि अथर्व यांची कथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असते आणि ते लग्न करुन संसार थाटणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण देखील आहे. पण तिच्या आयुष्यात सगळे काही चुकीचे सुरु आहे. तिचा संसार हा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे. त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळे वळण मिळेल? याविषयी जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे.
चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.
गणेश चतुर्थी, भगवान गणेश की पूजा और उत्सव का समय है. गणेश की मूर्ति भक्त…
कपिल शर्मा (Kapil Sharma) हर साल धूमधाम से गणेश चतुर्थी सेलिब्रेट (Ganesh Chaturthi) करते हैं.…
'कुंडली भाग्य' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये प्रीताची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा आर्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही.…
बॉलीवुड के चॉकलेटी बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) की बहन रिद्धिमा साहनी (Riddhima Sahni) भले…
"बाहर निकलो सब!" लोगों की भीड़ जुटने से मेरी हिम्मत बढ़ चुकी थी. डरी हुई…
मलायका अरोरा सध्या शॉकमध्ये आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी काल घराच्या बाल्कनीतून उडी मारून…