Marathi

‘मेड इन हेवन’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार (Made In Heaven Season 2 Coming Soon On Prime Video)

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये वेब मालिकांचा समावेश झाला आणि वेगळेच अर्थकारण सुरु झाले. आज भारतामध्ये चित्रपटांच्या तोडीस तोड प्रतिसाद हा वेबसीरिजला मिळाल्याचे दिसून आले आहे. सेक्रेड गेम्स पासून झालेली सुरुवात ही आता द नाईट मॅनेजर पर्यंत आली आहे. त्याचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. याशिवाय आणखी एका मालिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘मेड इन हेवन’ या मालिकेच्या वेगळेपणामुळे नेटकऱ्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. काही बोल्ड सीनमुळे ही मालिका वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली होती. मात्र दमदार कथानक आणि अभिनय यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आता तब्बल चार वर्षांनी या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामध्ये जिम सरभ, शोभिता धुलिपाला, अर्जून माथूर आणि कल्की केकला सारख्या कलावंतांनी काम केले आहे.

मेड इन हेवन नावाच्या मालिकेला इमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते. या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. मेड इन हेवनच्या मेकर्सकडून नव्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले असून चाहत्यांनी यावरुन आनंद व्यक्त केला आहे.

मालिकेच्या गोष्टीविषयी सांगायचे झाल्यास, दोन वेडिंग प्लॅनर्स तारा आणि करण आपआपल्या व्यवसायामध्ये दंग आहेत. ताराची भूमिका शोभिता आणि करणची भूमिका अर्जूननं साकारली आहे. वेडिंग प्लॅनिंगसोबतच आपलं वैयक्तिक आयुष्य कसं संकटात सापडतं, आयुष्यातील चढउतार याविषयी या मालिकेच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे.

एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट तसेच टायगर बेबी यांनी या मालिकेची निर्मीती केली आहे. ‘मेड इन हेवन सीझन 2′ लवकरच केवळ प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होईल. गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षक या मालिकेची वाट पाहत आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli