कशिश मुंबई इंटरनॅशनल क्वीअर फिल्म फेस्टीवल सध्या मुंबईत सुरू आहे. या महोत्सवात माधुरी दिक्षीतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मजा मा’ या चित्रपटाचा खेळ झाला. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या खेळाच्या निमित्ताने रेड कार्पेटवर अभिनेत्री सिमोन सिंग, बरखा सिंग, ऋत्विक भौमिक आणि सृष्टी श्रीवास्तव यांनी तसेच दिग्दर्शक आनंद तिवारी व महोत्सव संचालक श्रीधर रंगायन यांनी हजेरी लावली.
ॲमेझॉनचा ओरिजिनल मूव्ही असलेल्या ‘मजा मा’ या चित्रपटातील माधुरी दिक्षीत व सिमोन सिंग या अभिनेत्रींनी रेनबो व्हॉईसेस पारितोषिकाने गौरविण्यात आले. त्यावर प्रत्त्युत्तर म्हणून माधुरीने स्पेशल व्हर्च्युअल मेसेज पाठवला. त्यात ती म्हणते, ” ‘मजा मा’ या चित्रपटाला माझ्या मनात विशेष स्थान आहे. पल्लवी पटेल ही त्यातील प्रेमळ पत्नी व जबाबदार आईची व्यक्तीरेखा मी केली आहे. या पात्राची रुपरेखा ऐकताच मी तिच्या प्रेमात पडले होते. कशिश २०२३ महोत्सवात ‘मजा मा’ चे प्रदर्शन झाल्याचा मला अतीव आनंद झाला आहे.”
“रेनबो व्हॉईसेस ॲवॉर्ड मिळाल्याने माझा मोठा सन्मान झाला आहे. हा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण आहे,” अशा भावना सिमोन सिंग हिने व्यक्त केल्या.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…