Marathi

झलक दिखला जा फेम मनीषा राणी हॉस्पिटलमध्ये भरती, डान्सचा जास्त सराव केल्यामुळे तब्येत बिघडली (Manisha Rani Hospitalized Due To Heavy Practice Of Jhalak Dikhhla Jaa11)

 सध्या ‘झलक दिखला जा’ या डान्स शोच्या ११ व्या सीझनमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवून मनीषा राणीने प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉस ओटीटी २ पासूनच तिच्या चाहत्या वर्गात वाढ झालेली. आता मनीषाशी संबंधित एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोत मनिषा हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे दिसते.

फोटोत मनीषाची हालत फारचं बिकट दिसते. तसेच तिला हातावर सलाइन लावले आहे. मनीषाचा फोटो पाहिल्यापासून चाहते ती बरी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

व्हायरल मनीषाच्या फोटोसोबत एक नोट लिहिली आहे. त्यात लिहिले की, मला तुझा रोजचा स्ट्रगल माहित आहे. तू झलक दिखला जा मध्ये तुझे नेहमीच सर्वोत्तम देतेस. आता तुझी शारिरीक ताकद खूपच कमी झाली आहे. पण आम्हांला माहित आहे की तू लवकर पुन्हा नव्या दमाने येशील, कारण मी १२-१५ तासांच्या रिहर्सल दरम्यान तुझी मेहनत पाहिली आहे. मनीषा, लवकर बरी हो.

मनीषा ‘झलक दिखला जा’साठी सतत डान्स रिहर्सल करत होती. यामुळे, तिची शारिरीक क्षमता कमजोर झाली. जास्त रिहर्सलचा तिच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

मनीषा राणी ‘झलक दिखला जा ११’ च्या पुढील काही एपिसोडमध्ये दिसणार नाही असे सांगण्यात येत आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- अपाहिज़ (Short Story- Apahij)

"प्यार वाली बात कहां से आ गई.. आपको भी तो जीजू…""नहीं रे," दीदी ने मेरा…

April 24, 2024

महाराष्ट्राची हास्यजत्रानंतर गौरव मोरे गाजवतोय हिंदी शो, जुही चावलासोबत धमाल जुगलबंदी चर्चेत ( Gaurav More Share Cute Bond With Juhi Chavla On The Set Of Madness Machayege )

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे ! कॉमेडीची अचूक संधी साधत…

April 24, 2024

फिटनेसचे 15 फायदे (15 Benefits Of Fitness)

नियमित व्यायाम करण्याचे काय फायदे होतात, ते जाणून घ्या आणि निरोगी राहा… आपलं शरीर फिट…

April 24, 2024

मनीषा कोईरालाने माधुरीला घाबरून एक चांगला सिनेमा नाकारला; आज होतोय पश्चाताप (Manisha Koirala Rejected Dil Toh Pagal Hai Due To ‘Insecurity’: ‘Was Pitted Against Madhuri Dixit, Got Scared’)

'हिरामंडी द डायमंड बझार' या सिनेमातून अभिनेत्री मनीषा कोईरालाने बऱ्याच काळाने सिनेविश्वात कमबॅक केलंय. संजय…

April 24, 2024
© Merisaheli