Home Remedies Marathi

गुणकारी अननस (Medicinal Values Of Pineapple)

विशिष्ट सुवास असलेले रसदार, आंबट-गोड चवीचे अननस चविष्ट लागते. पाणीदार फळ असल्याने ते शरीरास पोषक घटक देते. (Medicinal Values Of Pineapple)
या अननसात ब्रोमेलॅन एन्झाईम असते. जे आपल्या पचनाच्या समस्या दूर करते. यामध्ये फायबर्स अधिक प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठ झाल्यास उपयुक्त ठरते., कारण ते आतड्याची निगा राखतात.
अननस शक्तिवर्धक आहे. त्याच्या सेवनाने भूक लागते. पोटदुखी, अ‍ॅसिडिटी या विकारांवर मात करते. अंगातला अशक्तपणा कमी करते.

घरगुती उपाय
– अ‍ॅसिडीटी होत असल्यास पिकलेल्या अननसाच्या रसात हिंग, सैंधव मीठ आणि आल्याचा रस मिसळून, हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ घेतल्यास गुण येईल.
– पोटात दुखत असेल तर फक्त 10 मिलिग्रॅम अननसाच्या रसात किंचित भाजलेला हिंग आणि आल्याचा रस मिसळा अन् हे मिश्रण रोज प्या. गुण येईल.
– भरपेट जेवण केल्यानंतर पोटाला तड लागली किंवा बेचैन वाटलं तर अननसाचा रस प्या. तड उतरेल.
– ताप आल्यास, अननसाच्या रसात थोडेसे मध मिसळून प्या. ताप कमी होईल.
– मूत्रविकाराची समस्या असल्यास, अननसाच्या रसात गूळ मिसळा. तो विरघळल्यावर रस प्या. समस्या दूर होईल.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024

कहानी- स्पर्श… (Short Story- Sparsh…)

विनीता राहुरीकर “मैं भी यही सोच रही हूं… क्या हम सचमुच में अपने बच्चे से…

April 30, 2024

‘कर्मवीरायण’ शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट ( Karmavirayan Movie Release Date Disclose )

महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात…

April 30, 2024
© Merisaheli