Marathi

मिथून चक्रवर्ती यांना मातृशोक, मुलगा नमाशीने दिली आजीच्या निधनाची माहिती ( mithun chakraborty mother pass away )

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आई शांतिराणी चक्रवर्ती यांचे निधन झाले. अभिनेत्याचा धाकटा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने आजीच्या निधनाची पुष्टी केली. ‘आनंद बझार’शी बोलताना नमाशी याने आजीच्या निधनाला दुजोरा दिला आणि सांगितले, ‘हो, बातमी खरी आहे. आजी आता आमच्यात नाहीत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आई शांतराणी यांचे ६ जुलै रोजी निधन झाले. अनेक दिवसांपासून त्या वयाच्या समस्येने त्रस्त होत्या आणि काल (६ जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी शोकाकुल कुटुंबासाठी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. टॉलिवूड, बॉलिवूड कलाकार, राजकारणी आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी चक्रवर्ती कुटुंबाला झालेल्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बंगाली रिअॅलिटी शो ‘डान्स बांग्ला डान्स सीझन 12’ च्या सहकलाकारांनीही त्यांच्यासाठी शोक व्यक्त केला आहे. मिथुन चक्रवर्तीच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस संघर्षाचे होते. जोराबागनमध्ये ते आई-वडील आणि भावंडांसोबत राहत होते. ते एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबातील होते. मिथुन यांनी नेहमीच त्यांच्या पालकांनी त्यांचे आणि त्यांच्या भावंडांचे चांगले संगोपन केले.

मिथुन डान्स शोचे जज बनले

ते नेहमी त्यांच्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांबद्दल आणि संघर्षाबद्दल बोलत असतात. अभिनेते सध्या बंगाली रिअॅलिटी शो ‘डान्स बांग्ला डान्स’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. जवळपास दशकानंतर ते डान्स बांग्ला नृत्य परिवारात परतले आहे.

मिथुन चक्रवर्ती कुठे आहेत?

मिथून ‘डान्स डान्स ज्युनियर’च्या तिसऱ्या सीझनच्या नवीन भागाचा भाग नव्हते. त्याऐवजी, त्यांनी ‘डान्स बांगला डान्स सीझन 12’ मध्ये पुनरागमनाची घोषणा केली. मिथुन चक्रवर्तीनेही टॉलिवूडशी नातं जपलं आहे. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘प्रजापती’ या चित्रपटात त्यांनी देवच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- सेटलमेंट (Short Story- Settlement)

उसका अत्यधिक आत्मविश्वास और उसकी चंचलता उसे प्रिय थे. वह कब क्या कर बैठे और…

May 19, 2024

डिप्रेशनमध्ये गेलेला ज्युनियर एनटीआर, राजमौलींनी दिली साथ ( Junior NTR, who went into depression, supported Rajamouli)

ज्युनियर एनटीआर आणि राजामौली यांच्या जोडीने पडद्यावर काय धमाका निर्माण केला हे संपूर्ण जगाने RRR…

May 19, 2024

कर्णबधिरांच्या मदतीसाठी सोनू सूदचा नवा उपक्रम, व्हिडिओ शेअक करत दिली माहिती ( Sonu Sood new initiative to help deaf people, informed by sharing video )

पडद्यावर खलनायक आणि खऱ्या आयुष्यात नायक अशी अनोखी ओळख सोनू सूदला मिळाली आहे. करोनाच्या काळात…

May 19, 2024
© Merisaheli