रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा : सव्वा लाख सुनांची सासू… कोण होत्या त्या? असं काय केलं त्यांनी? (Mother-In-Law Of 1.25 Lakh Daughter-In-Laws : Who Is She? What Did She Achieve?)

आज १६ सप्टेंबर. पाकशास्त्रात अद्वितीय कामगिरी केलेल्या एका जगावेगळ्या कर्तबगार महिलेचा जन्मदिन! त्या आहेत ‘रुचिरा’ या अतिशय गाजलेल्या, पाककृतीवरील पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले!

कमलाबाईंनी लिहिलेले हे पुस्तक १९७० साली प्रकाशित झाले. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेल्या या मराठी पुस्तकाच्या ३० वर्षात २ लाखांहून अधिक प्रती खपल्या आहेत. लक्षावधी प्रती खपलेलं हे एकमेव मराठी पुस्तक आहे. ‘रुचिरा’च्या सव्वा लाख प्रती जेव्हा विकल्या गेल्या होत्या, तेव्हा लेखिका कमलाबाई ओगले यांना ‘सव्वा लाख सुनांची सासू’ हे बिरुद चिकटलं, ते आजतागायत कायम आहे. कारण प्रकाशित झाल्यापासून हे पुस्तक नवविवाहित तरुणींचे दीपस्तंभ ठरले. सोप्या भाषेत लिहिलेल्या, दररोज करू शकणाऱ्या पाककृती शिकण्याबाबत त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरले. लग्नात हे पुस्तक नववधूला भेट देण्याची प्रथा त्या काळी पडली होती. हे पुस्तक वाचून अनेक गृहिणी पाककलेत सुगरण झाल्याची उदाहरणे आहेत.

विक्रमी खपाचा उच्चांक गाठणारे एक पाककलेचे पुस्तक लिहिणाऱ्या कमलाबाई ओगले यांचे जीवनचरित्र विलक्षण आहे. दांडेकर कुटुंबात त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ साली झाला. खेडेगावात जन्मलेल्या कमलाबाईंनी इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर लग्न होऊन त्या सांगली शहरात ओगले यांच्या घरात आल्या, तेव्हा स्वयंपाकात त्या पारंगत नव्हत्या. आपल्या सासूबाईंकडून त्यांनी विविध पाककृती शिकून घेतल्या.

पुढे यजमानांची बदली झाल्याने त्या मुंबईत आल्या. इथे विविध पाककला स्पर्धेत भाग घेऊ लागल्या. उत्कृष्ट पाककृती व त्याची सजावट यासाठी त्यांना नेहमीच प्रथम पारितोषिक मिळत गेले. त्या एस. एन. डी. टी. या महिलांच्या विद्यापीठात पाककला मार्गदर्शक राहिल्या. पुढे त्यांनी पाककलेचे वर्ग सुरू करून कित्येक महिलांना पाककला शिकविल्या. अन्‌ ‘रुचिरा’ हे पुस्तक लिहून विक्रम केला.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साहित्याची मापे ग्रॅम, मिलिग्रॅम अशी आजच्या प्रथेसारखी नसून, चमचा, वाटी ही मापे आहेत.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

वैष्णोदेवी परिसरात मद्यप्राशन केल्याने ओरीसह आठ जणांविरुद्ध एफआयआर (Orry Allegedly Drinks Near Vaishno Devi Base Camp)

बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी वादात सापडला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा…

March 17, 2025

‘ठरलं तर मग’ मालिकेला दुसऱ्यांदा महामालिका पुरस्कार, तर ‘आता होऊ दे धिंगाणा’ ठरला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम (Star Pravah Awards Presented : “Tharle Tar Mag” Serial Bags Best Series Award For The 2nd Year)

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५ नुकताच जल्लोषात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे पाचवं…

March 17, 2025

“प्लीज मला त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणू नका”, ए आर रेहमान यांच्या पत्नी सायरा बानो यांचा खुलासा (Ar Rahman Wife Saira Banu Reveals They Are Separated Not Officially Divorced)

ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. डिहायड्रेशनमुळे त्यांना…

March 17, 2025

कहीं आप भी तो नहीं हैं इन फिटनेस मिथ्स के शिकार? (Are You Also A Victim Of These Fitness Myths?)

आजकल अधिकांश लोग फिटनेस फ्रीक हो गए हैं. वैसे भी आजकल फ़िटनेस की बातें करना,…

March 17, 2025
© Merisaheli