Marathi

नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात (Naga Chaitanya and Sobhita Dhulipala’s Wedding Rituals Begin)

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अवघ्या काही दिवसांत अधिकृतपणे ‘मिस्टर अँड मिसेस’ बनतील. 4 डिसेंबर रोजी कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हे जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. गाठ बांधण्यापूर्वी त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मंगलस्नानाने लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नापूर्वी या जोडप्याच्या मंगल स्नान आणि हळदी समारंभाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्नगाठ बांधतील आणि एकमेकांचे कायमचे बनतील, परंतु त्याआधीच त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाल्या आहेत. या जोडप्याने त्यांच्या अलाद म्हणजेच हळदी समारंभासाठी आधीच खूप खास तयारी केली होती, ज्याचा अंदाज या जोडप्याचे फोटो बघून लावता येतो.

शोभिताने नागा चैतन्यच्या नावाने हळद लावण्यासाठी प्रथम पातळ कापडाची साडी नेसली, मंगलस्नानानंतर ती नागा चैतन्यकडे पोहोचली. शोभिताला आपल्यासमोर नववधूच्या वेषात पाहून नागा चैतन्यला तिच्यापासून नजर हटवता आली नाही, तर शोभिता आपल्या भावी पतीला पाहून लाजेने लाल झाली.

दक्षिणेत होणाऱ्या विवाहांमध्ये मंगलस्नान हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो की, मंगलस्नानाशिवाय विवाह विधी अपूर्ण आणि अपवित्र मानले जातात, त्यामुळे मंगलस्नान अत्यंत महत्त्वाचे आहे. या विधी दरम्यान, सर्व कुटुंबातील सर्व सदस्य आधी आंब्याच्या पानांसह वधूला हळद लावतात, नंतर पाण्याने भरलेले एक मोठे तांब्याचे भांडे आणले जाते आणि त्या पाण्याने वधूला आंघोळ घालतात.

असे मानले जाते की मंगल स्नान केल्याने विवाहानंतर वधूचे वैवाहिक जीवन शुभ होते आणि वैवाहिक जीवनात नेहमी सुख, समृद्धी, प्रेम आणि आनंद राहतो. हे स्नान केल्याने कुंडलीत गुरु, मंगळ आणि सूर्य हे ग्रह बलवान होतात, त्यामुळे विवाहात कोणताही अडथळा येत नाही.

हळदी समारंभासाठी शोभिताने पिवळ्या रंगाची हलकी साडी नेसली होती, जी साऊथ कॉटनची होती. ती साडी अगदी साधी होती, ज्यावर कोणत्याही प्रकारची नक्षी केलेली नव्हती. मात्र, हळदीपूर्वी पूजेदरम्यान शोभिताने या साध्या साडीसोबत लाल बनारसी सिल्कचा दुपट्टा घातला होता. यादरम्यान शोभिताने कमीत कमी मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला होता.

मंगलस्नानानंतर, शोभिताने नागा चैतन्यसोबत क्लिक केलेला फोटो देखील मिळाला, ज्यामध्ये अभिनेत्रीने सुंदर सिल्कची साडी परिधान केलेली वधूसारखी होती. तिने या साडीसोबत प्लेन फुल स्लीव्ह ब्लाउज घातला होता आणि तिच्या दागिन्यांची निवड अगदी रॉयल ठेवली होती.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या वर्षी 8 ऑगस्ट रोजी एंगेजमेंट झाली होती. आता हे जोडपे 4 डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. स्टुडिओच्या बागेत दोन्ही कुटुंबांचे लग्न होणार आहे, ज्यामध्ये केवळ 300 ते 400 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना वडील नागार्जुन यांनी अलीकडेच सांगितले होते की, त्यांचा मुलगा नागा चैतन्यला थाटामाटात लग्न करण्याऐवजी साधेपणाने लग्न करायचे आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli